भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, उमेदवारी नाकारल्याने बंडखोरी

गेली वर्ष प्रभागात मेहनत घेऊनही रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांनी आज पक्षाच्या पदाचे राजीनामा दिले आहेत. भाजपचे रत्नागिरी शहर सरचिटणीस नीलेश आखाडे आणि बेटी बचाओ बेटी पढाओच्या संयोजिका प्राजक्ता रूमडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे दोघेही अपक्ष रिंगणात आहेत.

भाजपच्या काही उमेदवारांना शिंदेगटात पाठवून उमेदवारी देण्यात आली मात्र प्रभागात पाच वर्ष काम करूनही भाजपने उमेदवारी नाकारल्याने प्राजक्ता रूमडे नाराज झाल्या आहेत. त्यांनी प्रभाग क्र.६ मधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. भाजपचे शहर सरचिटणीस नीलेश आखाडे हे प्रभाग क्र.७ मधून इच्छुक होते.ती जागा शिंदे गटाला सोडण्यात आल्याने नीलेश आखाडे नाराज झाले.त्यांनीही बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. आज नीलेश आखाडे यांनी शहर सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे.

Comments are closed.