परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात सल्फर भट्टीचा स्फोट; दोन ठार
परतूर येथील बागेश्वरी साखर कारखान्यात सल्फर भट्टीचा स्फोट होऊन भट्टीवर काम करणारे दोन कर्मचारी जागीच ठार तर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.
बागेश्वरी साखर कारखान्यात सायंकाळी सहाच्या सुमारास सल्फर भट्टीचा अचानक स्फोट झाला. भट्टीवर काम करणारे कर्मचारी सल्फटेशनमेन आबासाहेब शंकर पारखे (वय – 42, रा. सिरसगाव, ता. परतूर) आणि ज्यूस सुपरवायझर अशोक तेजराव देशमुख (वय – 56, रा. राहुरी, ता. सिंदखेडराजा, जि. बुलढाणा) हे दोघे जागीच ठार झाले. इतर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी कर्मचाऱ्यावर परतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मयत कर्मचाऱ्यांचे शवविच्छेदन शुक्रवारी सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. आर. नवल यांनी दिली आहे.
Comments are closed.