'दोनशे अधिकारी आमच्या संपर्कात आहेत'

नवी दिल्ली  :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्वृत्वातील सरकारमधील 200 हून अधिक उच्च पदस्थ अधिकारी आमच्या संपर्कात आहेत, असा सनसनाटी दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे प्रतिपादन केले. या अधिकाऱ्यांमध्ये प्रवर्तन निदेशालयाचे अधिकारी, परराष्ट्र व्यवहार विभागाचे अधिकारी आणि सीबीआयचे अधिकारी यांचा समावेत आहे, असेही गांधी यांचे म्हणणे आहे. तथापि, त्यांनी या अधिकाऱ्यांची नावे उघड करण्यास नकार दिला. तसेच, त्यांच्याकडून विरोधी पक्षांना कोणती माहिती मिळते, हे देखील त्यांनी स्पष्ट केले नाही. तसेच सध्याच्या  विरोधी पक्षांच्या आंदोलनांशी या बाबीचा काय संबंध आहे, हेही त्यांनी उघड केले नाही. आज आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करीत आहोत. अन्य काही संघटनाही याच विषयावर आंदोलने करीत आहेत. ही सारी आंदोलने एकत्र होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. हे प्रतिपादन करुन त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीला संकेत दिला असून काँग्रेस या संघटनेसह सहकार्य करण्यास तयार आहे, असे अप्रत्यक्षरित्या दर्शविले आहे. त्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. प्रथम ज्ञानेश कुमार, नंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदत्यागासाठी हे आंदोलन होत आहे. हे एकच आंदोलन असून ते स्वतंत्र नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.