ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वनडे आणि टी-20 संघांची घोषणा! संघ निवडीतील या 5 गोष्टींनी चाहते हैराण
भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळायचे आहेत. वनडे मालिकेची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून होईल, तर टी20 मालिकेचा प्रारंभ 29 ऑक्टोबरपासून होणार आहे.
या दोन्ही मालिकांसाठी अजीत आगरकर (Ajit Agarkar) यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने 2 टीम इंडियांची घोषणा केली आहे. या टीममध्ये काही धक्कादायक निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतले आहेत. निवडकर्त्यांनी भारतीय संघ व्यवस्थापनाला स्पष्ट केले आहे की, आता ते वनडे वर्ल्ड कप 2027साठी तयारी सुरू करतील.
भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड जाहीर झाली आहे. त्यामुळे स्पष्ट झाले की, रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली सलग चांगल्या फॉर्ममध्ये राहिले तर त्यांना आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 खेळण्याची संधी मिळू शकते.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) ऐवजी सध्या अक्षर पटेलला (Axar Patel) जास्त संधी मिळताना दिसत आहे. हार्दिक पांड्याचा (Hardik pandya) पर्याय म्हणून नीतीश कुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) संघाची पहिली पसंती ठरला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये ध्रुव जुरेल सध्या संजू सॅमसनच्या तुलनेत पुढे आहे. शिवाय अजीत आगरकर यांनी स्पष्ट केले आहे की, आता तीनही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार राहणार नाहीत.
Comments are closed.