सिंगापूरमध्ये दोन हिंदुस्थानींना पाच वर्षांचा कारावास

प्रातिनिधिक छायाचित्र

सिंगापूरमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या दोन हिंदुस्थानी तरुणांना पाच वर्षे आणि एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. अरोक्कियासामी डेसन (वय 23) आणि राजेन्द्रन मयिलारासन (वय 27) अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांवर महिलेला मारहाण करणे, त्यांची रोख रक्कम, पासपोर्ट आणि अन्य सामानांची चोरी करणे, या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनी दोन महिलांना हॉटेलमध्ये बोलावले. त्यांचे हात बांधले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली होती.

Comments are closed.