हॉर्मुझमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात मालवाहू जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी; दोन जण जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत एका मालवाहू जहाजावर क्षेपणास्त्र करण्यात आला आहे. या हल्ल्यात जहाजावरील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. हा हल्ला कुणी केला याबाबत अद्याप माहिती समजू शकली नाही. संबंधित अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर जहाजाला आग लागली आणि जहाज पाण्यावर तरंगत राहिले. युनायटेड किंगडम सागरी व्यापार ऑपरेशन्स (UKMTO) ने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर जहाजावरील सर्व कर्माचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र दोन जण यात जखमी झाले असून जखमींबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. तसेच जहाजावर एकूण किती कर्मचारी होते याबाबतही माहिती उपलब्ध नाही.

दरम्यान, UKMTO ने या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इतर जहाजांसाठी एक मानक सूचना जारी केली आहे. यात जहाजांना अधिक सावधगिरी बाळगण्याचे आणि कोणतीही असामान्य किंवा संशयास्पद हालचाल आढळल्यास थेट संस्थेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.