Two killed and two seriously injured in ST bus accident in Chopda town of Jalgaon district
गेल्या काही काळापासून एसटी बसमधून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतायत. कारण मागील काही महिन्यांपासून एसटी बसच्या अपघातात वाढ झाली आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एसटी बसच्या अपघाताची माहिती समोर येत आहे.
जळगाव : गेल्या काही काळापासून एसटी बसमधून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसतायत. कारण मागील काही महिन्यांपासून एसटी बसच्या अपघातात वाढ झाली आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून एसटी बसच्या अपघाताची माहिती समोर येत आहे. शहरातील गजबजलेल्या भागात ब्रेक फेल झाल्यानंतर एसटीने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. (two killed and two seriously injured in ST bus accident in Chopda town of Jalgaon district)
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरातील स्वस्तिक टॉकिज परिसरात एसटी (क्र MH 40, N9828) या बसचे ब्रेक फेल झाले. लासूरकडून चोपडा आगारात येत असताना शहरातील गजबजलेल्या भागात भरधाव एसटी बसचे ब्रेक फेल झाले. त्यानंतर एसटी बसने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडले. ब्रेक फेल झालेल्या बसने दुचाकीला चिरडल्यानंतर एका रिक्षाला देखील धडक दिल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा – Cabinet Decisions : माझे घर, माझा अधिकार… राज्यात आता नवीन गृहनिर्माण धोरण, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
या अपघातात रवींद्र बहारे (40 वर्ष) आणि सोनू रशीद पठाण (22 वर्ष) या दोघांचा मृत्यू झाला, तर अनिता बहारे आणि शाकीर शेख हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालय तसेच खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, बसने दुचाकीस्वरांना चिरडल्याची संपूर्ण घटना कैद झालेल्या सीसीटीव्हीचे व्हिडीओ समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली असून डॉक्टरांना उपचाराचे निर्देश दिले.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : त्यांच्यामुळेच मराठ्यांचे नुकसान, मंत्रिपदाची शपथ घेताच भुजबळांचा जरांगेंवर प्रतिहल्ला
Comments are closed.