गुजरातमध्ये ट्रेनच्या धडकेने दोन सिंहिणींचा मृत्यू

राजकोट: गुजरातमधील राजकोट जिह्यात रेल्वेच्या धडकेत दोन सिंहिणींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी रात्री जेतपूरजवळ ही दुर्घटना घडली. मृत सिंहिणींचे वय अंदाजे 2 ते 3 वर्षे होते. धासा-जेतलसर ब्रॉडगेज रेल्वेमार्गावरील वावडी आणि खिरसरा या स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. जेतपूर रेल्वे स्थानकापासून हे ठिकाण सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. दोन्ही सिंहिणी रेल्वे ऊळ ओलांडत असताना पोरबंदर-भावनगर पॅसेंजर टेन क्रमांक 59560 ची त्यांना जोरदार धडक बसली. या दुर्घटनेनंतर रेल्वे थांबवण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली. दोन सिंहिणींचा मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.