निवडणुकीवर वॉच ठेवण्यासाठी उल्हासनगरमध्ये दोन निरीक्षक

निवडणूक आयोगाने उल्हासनगर पालिका निवडणुकीवर वॉच ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची नियुक्ती केली असून हे दोन्ही अधिकारी शहरात दाखल झाले आहेत. नीलेश गटणे हे मुख्य निरीक्षक असून ते महाराष्ट्र पर्यटक विकास महामंडळाचे व्यवस्थापक संचालक आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे हे दुसरे निवडणूक निरीक्षक आहेत.

हे दोन्ही अधिकारी निवडणुकीचे कामकाज आणि निवडणुकीच्या प्रक्रियेचे दररोज निरीक्षण करून कामकाजाचा अहवाल आयोगाला पाठवणार आहेत. यापूर्वीच निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी उल्हासनगरात बाळासाहेब तिडके, गणेश सांगळे, विशाल जाधव, विजयकुमार वाकोडे, मुकेश पाटील आणि डॉ. संजय शिंदे हे सहा निवडणूक निर्णय अधिकारी पाठवलेले आहेत. आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली या अधिकाऱ्यांनी उमेदवारांना नामनिर्देश पत्रे देणे, उमेदवारी अर्ज स्वीकारणे आणि छाननी करणे ही प्रक्रिया हाताळलेली आहे.

निवडणूक यंत्रणेचा आढावा

महापालिकेत दाखल होताच मुख्य निवडणूक निरीक्षक नीलेश गटणे, आणि रवींद्र ठाकरे यांनी आयुक्त मनीषा आव्हाळे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस, उपायुक्त विशाखा मोटघरे, निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्या सोबत शहरातील निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला आहे. पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्याच्या सूचना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्या.

Comments are closed.