रेल्वे आंदोलन, युनियनच्या दोन पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मुंब्रा येथे पडून प्रवाशांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. या प्रकरणी मध्य रेल्वे मजदूर संघाने गेल्या आठवडय़ात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन केले होते. आंदोलन केल्या प्रकरणी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस पोलिसांनी सीआरएमएस युनियनमधील दोन आणि अन्य 40 जणांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ट्रेनचे मोटरमन, गार्ड, सहाय्यक स्टेशन व्यवस्थापक आणि स्टेशन व्यवस्थापकांशी चुकीच्या पद्धतीने वागून त्याना कर्तव्य बजवण्यापासून रोखल्याने रेल्वे पोलिसांनी हा गुन्हा नोंद केला. यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे पोलीस आयुक्तांनी 17 ऑक्टोबर रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 163 अनुसार 19 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर या काळात रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई केली होती. मनाई असतानादेखील सीआरएमएस रेल्वे युनियनने 200हून अधिक आंदोलकांनी या आदेशाचे उल्लंघन केले होते.

Comments are closed.