मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस, अडीच कोटी रुपयांत सुपारी दिली; बीडमधून दोन जणांना अटक

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जरांगे यांच्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली असल्याची तक्रार आल्यानंतर जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करून बीड जिल्हय़ातून दादा गरूड आणि अमोल खुणे या दोन जणांना अटक केली. यापैकी अमोल हा जरांगे यांचा पूर्वीचा सहकारी असल्याचे तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येसाठी बीड येथे गुप्त बैठक झाल्याची माहिती जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांना मिळाली. अडीच कोटी रुपयात सुपारी वाजवण्याचे ठरल्याची पक्की माहिती मिळताच काळकुटे यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार केली. तक्रार मिळताच जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करून बीड येथून दादा गरुड आणि अमोल खुणे या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत या दोघांनी एका मोठय़ा राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी स्वतŠ रात्री उशिरा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.
मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट उघडकीस आल्याने राज्यात खळबळ उडाली असून जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जरांगे यांना अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

Comments are closed.