वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याऱ्या दोन आरोपींना अटक, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुण्यात वारीला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. आता पोलिसांनी या आरोपींचा शोध घेतला असून दोघांना अटक केली आहे.
पुण्याच्या दौंड तालुक्यात एक अल्पवयीन मुलगी आपल्या दोन महिला नातेवाईकांसोबत वारीला निघाली होती. तेव्हा स्वामी चिंचोली परिसरात दोन नराधमांनी या मुलीवर बलात्कार केला होता आणि महिलांच्या अंगावरी दागिनेही चोरले होते. गेले तीन दिवस पोलीस आरोपींच्या मागावर होते. अखेर या नराधमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांनी यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अमीर पठाण आणि विकास सातपुते या दोघांना अटक केली आहे.
Comments are closed.