पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, पाच सुरक्षा कर्मचारी ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यात आत्मघाती हल्ला करण्यात आला असून त्यात एका लेफ्टनंट कर्नल दर्जाच्या अधिकाऱयासह पाच सुरक्षा कर्मचारी ठार झाले. याशिवाय एका नागरिकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, बन्नू जिह्यातील सरार दर्गा परिसरात एका आत्मघाती हल्लेखोराने स्पह्टकांनी भरलेली रिक्षा सुरक्षा दलाच्या भुसुरुंगविरोधी वाहनावर धडकवली. त्यावेळी झालेल्या स्पह्टात लेफ्टनंट कर्नल शहजादा गुल यांच्यासह 5 सुरक्षा कर्मचारी जागीच ठार झाले. ‘तेहरिक-ए-तालिकान पाकिस्तान’ या संघटनेवर संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Comments are closed.