मणिपूर हल्ल्याच्या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मणिपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी आसाम रायफल्सच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही संशयितांची मणिपूर पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. नंबोल सबल लीकाई परिसरात झालेल्या हल्ल्यात वापरलेली व्हॅन देखील जप्त करण्यात आल्याचे मणिपूर पोलिसांनी सांगितले. जप्त केलेल्या व्हॅनच्या  मालकाची ओळख पटली आहे. या प्रकरणाशी संबंधित अधिक माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आसाम रायफल्सच्या वाहन ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा झाले होते. तसेच अन्य पाच जवान जखमी झाले असून त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहेत.

Comments are closed.