आधी क्रिकेट, मग दहावीची परीक्षा; व्यस्त वेळापत्रकामुळे वैभव दहावीच्या परीक्षेला बसणार नाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी व्यस्त वेळापत्रकामुळे त्याच्या दहावीच्या बोर्ड परीक्षेला बसणार नाही. 19 वर्षांखालील विश्वचषकात प्रभावी कामगिरी केल्यानंतर त्याची सातत्याने प्रशिक्षण शिबिरे सुरू आहेत. त्यामुळे वैभवने बोर्ड परीक्षेला न बसण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली. बिहारमधील ताजपूर येथील रहिवासी असलेला वैभव मॉडेस्टी स्पूल ताजपूरचा विद्यार्थी आहे. 17 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत त्याची बोर्ड परीक्षा होणार होती.

वैभव सूर्यवंशीचा परीक्षा फॉर्म आधीच भरला होता, त्यामुळे प्रवेशपत्रदेखील आले होते. वडील संजीव सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केल्यानंतर वैभवने परीक्षेला न बसता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच पार पडलेल्या आयसीसी अंडर-19 क्रिकेट विश्वचषकात हिंदुस्थानला जेतेपद मिळवून देण्यात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली. सात सामन्यांत 439 धावा करून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो दुसरा आला होता होता. अंतिम सामन्यात 175 धावांची स्पह्टक खेळी करून वैभवने विक्रम रचला. तसेच स्पर्धेत सर्वाधिक 30 षटकार ठोकून डेवाल्ड ब्रेव्हिसचा 18 षटकारांचा विक्रम मोडीत काढला.

Comments are closed.