U19 Asia Cup: जियोस्टार नाही तर ‘या’ ठिकाणी पाहा भारत-पाक सामना, वैभव सूर्यवंशी मैदानात परत
भारताच्या युवा स्टार वैभव सूर्यवंशीने मागील सामन्यात यूएईविरुद्ध केलेल्या धमाकेदार फलंदाजीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. अवघ्या 95 चेंडूत 171 धावा ठोकत त्याने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे पुन्हा लक्ष वेधले. रविवारी, 14 डिसेंबर रोजी, दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात U19 आशिया कप 2025 चा दुसरा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात वैभवची खेळी आणि युवा भारतीय संघाची कामगिरी सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
अंडर-19 आशिया कप 2025 ची सुरुवात 12 डिसेंबर रोजी यूएईत झाली. पहिल्याच दिवशी भारतीय संघ मैदानात उतरला आणि कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली यजमान यूएईला 234 धावांनी पराभूत केले. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अपेक्षेप्रमाणेच वादळी फलंदाजी करत संघाला मोठा स्कोर गाठण्यास मदत केली. त्याचवेळी पाकिस्तान संघानेही आपल्या सामन्यात विजय मिळवला. सलामीवीर समीर मिन्हासने 177 धावा करत पाकिस्तानला 297 धावांपर्यंत पोहोचवले. या विजयी सुरुवातींमुळे भारत-पाकिस्तान सामन्याची थरारक स्थिती निर्माण झाली आहे.
भारत-पाकिस्तान सामना फक्त एक क्रिकेट मॅच नाही, तर भविष्यातील स्टार्सचा महासंग्राम आहे. दोन्ही संघ विजयी सुरुवात करून मैदानात उतरले आहेत. त्यांच्या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. हा सामना केवळ फक्त खेळासाठी नाही, तर युवा प्रतिभा सादर करण्याची संधी देखील आहे.
सामन्याची वेळ आणि ठिकाण ठरलेली आहे. सामना रविवार, 14 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. टॉस सकाळी 10 वाजता होईल. सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जाणार आहे. चाहत्यांसाठी हा सामना थेट टीव्हीवर Sony Sports Ten-1 वर प्रसारित केला जाणार आहे. शिवाय, ऑनलाइन चाहत्यांसाठी Sony Liv वर स्ट्रीमिंगची सोय देखील उपलब्ध आहे.
Comments are closed.