U19 WC: बांग्लादेशला लोळवणारा पार्ट-टाईम बॉलर आहे तरी कोण? पठ्ठ्या गिल-कोहलीचा फॅन
भारताने १९ वर्षाखालील वनडे विश्वचषक स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारताने पहिल्या सामन्यात अमेरिकेला हरवत दुसऱ्या सामन्यात बांग्लदेशालाही पराभवाची चव चाखायला लावली. आतापर्यंत या स्पर्धेत भारतीय गोलंदाज कमालीची कामगिरी करताना दिसत आहेत. सलग दुसऱ्या भारतीय गोलंदाजाने सामनावीर पुरस्कार पटकावत विरोधी संघाच्या फलंदाजांमध्ये भीती निर्माण केली आहे. बांग्लादेशच्या पराभवात फिरकीपटू विहान मल्होत्राने महत्वाचे योगदान दिले.
बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावला आणि प्रथम फलंदाजी केली. स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या ७२ धावा आणि विकेटकीपर अभिज्ञान कुंडूच्या ८० धावांच्या जोरावर भारताने ४८.४ षटकात सर्वबाद २३८ धावसंख्या उभारली. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आल्याने बांगलादेशला २९ षटकात १६५ धावांचे लक्ष्य मिळाले. बांग्लादेशच्या फलंदाजीची सुरूवात चांगली झाली.
बांग्लादेशची फलंदाजी सुरू असताना पावसामुळे सामना काही काळासाठी थांबवला गेला होता. त्यावेळी बांग्लादेशला जिंकण्यासाठी ७० चेंडूत ७५ धावा हव्या होत्या आणि त्यांच्याकडे ८ विकेट्सही शिल्लक होते. अशी स्थिती असताना भारताचा कर्णधार आयुष म्हात्रेने गोलंदाजीसाठी विहानला बोलावले. त्याने कमी धावा देण्याबरोबरच विकेट्सही काढल्या याचा परिणाम असा की बांग्लादेश १०६ धावंख्येवर २ बाद असताना थेट १४६ धावसंख्येवर सर्वबाद झाला.
भारताचा उपकर्णधार असलेल्या विहानने या सामन्यात बांग्लादेशची फलंदाजी खिळखिळी केली. त्याने ४ षटकात १४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तत्पूर्वी त्याने फलंदाजीला येत खास कामगिरी केली नाही.
विहान भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातही खेळला आहे. तसेच तो आशिया कप स्पर्धेचाही भाग राहिला.
तसेच त्याने भारताचे कर्णधारपदही सांभाळले आहे. त्याने पटियाला क्रिकेट क्लबच्या कमलप्रीत संधूकडून प्रशिक्षण घेतले. तसेच त्याने १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडूनही अधिक ट्रेनिंग घेतली. तो भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांना आपला आदर्श मानतो.
Comments are closed.