W,W,W,W,W,W,W,W… एकाच वेळी अख्खा संघ रिटायर्ड आऊट! क्रिकेटमध्ये घडली अजब गजब घटना, 17 फलंदाजा

युएई विरुद्ध कतार टी 20 विश्वचषक पात्रता: क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक दिवस कोणता ना कोणता चमत्कार पाहायला मिळतात. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो, पण आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप पात्रता सामन्यात असे काही घडले, जे यापूर्वी कधीही पाहिले किंवा ऐकले नव्हते. हा सामना युएई आणि कतार महिला संघात खेळला गेला.

आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कप आशिया विभागीय पात्रता स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात कतार महिला संघ आणि कतार महिला संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात असा पराक्रम घडला जो कदाचित आजपर्यंत क्रिकेटमध्ये कधीच घडला नसेल. यूएईचे 10 फलंदाज शून्य धावांवर रिटायर्ड आऊट झाले. तरीही, युएईने 163 धावांनी सामना जिंकला. या सामन्यात युएईचे 9 आणि कतारचे 8 फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत.

17 फलंदाजांनी फोडला भोपळा…

या सामन्यात यूएई प्रथम फलंदाजी करत होता. संघाने 16 षटकांत 192 धावा केल्या होत्या. यानंतर, खराब हवामानामुळे यूएई क्रिकेट संघाने आपल्या सर्व फलंदाजांना रिटायर्ड आऊट करण्याचा निर्णय घेतला. पण, टी-20 स्वरूपात डाव घोषित करण्याचा कोणताही नियम नाही. या सामन्यात सर्व खेळाडू पॅड घालून मैदानावर पोहोचले आणि त्यांनी स्वतःहून रिटायर्ड आऊटचा निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये असे कधीही पाहिले गेले नाही, जेव्हा एकाच संघाचे 11 फलंदाज रिटायर्ड आऊट झाले. पण यूएई संघानेही असाच एक पराक्रम केला आणि सामना जिंकला.

कतारचा संघ 29 धावांवर झाला ऑलआऊट…

20 षटकांत 193 धावांचे लक्ष्य गाठताना कतार संघ फक्त 29 धावांवर ऑलआउट झाला. कतारच्या 8 फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. कतारकडून रिझफा बानो इमॅन्युएलने 29 चेंडूत 20 धावा केल्या. याशिवाय अँजेलिना मेरने 5 धावा आणि शाहरीन बहादूरने 2 धावा केल्या. याशिवाय कतारचे 8 फलंदाज शून्य धावांवर बाद झाले.

युएई संघ पहिल्या स्थानावर

या विजयासह युएईने त्यांचे दोन्ही सामने जिंकून चार गुण आणि +6.998 च्या नेट रन रेटसह स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. युएईने कतारला हरवण्यापूर्वी मलेशियावर नऊ विकेट्सने विजय मिळवला. त्यांचा पुढील सामना 13 मे रोजी बँकॉकमधील त्याच मैदानावर मलेशियाविरुद्ध होईल.

अधिक पाहा..

Comments are closed.