युद्धाचे फेक एआय व्हिडीयो केले व्हायरल, यूएईमध्ये 19 हिंदुस्थानींवर कारवाई
आखाती युद्धाचे सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडीओ पोस्ट केल्याबद्दल संयुक्त अरब अमिराती (यूएई) सरकारने 19 हिंदुस्थानींसह एकूण 35 जणांच्या अटकेचे आदेश दिले आहेत. एआयद्वारे बनावट व्हिडीयो आणि अफवा पसरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
तपासानुसार, आरोपींनी तीन वेगवेगळ्या पद्धतीने गुन्हे केले आहेत. यातील 10 जणांनी देशाच्या हवाई हद्दीत क्षेपणास्त्रs रोखली जात असल्याचे खरे व्हिडीओ चुकीच्या कॉमेंट्री आणि साऊंड इफेक्टसह शेअर केले. लष्करी तळांच्या विनाशाचे खोटे दावे करून लोकांमध्ये घबराट पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले. यात 5 हिंदुस्थानी आहेत. इतर 7 जणांनी एआय (एआय) वापरून बनावट स्फोट, आगीचे गोळे आणि ध्वजांचा वापर करून खोटे व्हिडीओ तयार केले. यातही 5 हिंदुस्थानी आहेत. तर आणखी 6 जणांनी इराणच्या लष्करी कारवायांचे आणि नेतृत्वाचे कौतुक करून यूएईच्या राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
एक वर्षाची कैद आणि दंड
यूएईच्या सायबर कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुह्यांसाठी अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. किमान १ वर्षांची कैद आणि किमान १ लाख एईडी म्हणजेच हिंदुस्थानी चलनात सुमारे 23 लाख रुपयांहून अधिक दंडाची तरतूद आहे.
Comments are closed.