उबरची अबुधाबीत विनाचालक रोबोटॅक्सी सेवा सुरू

उबर टेक्नोलॉजीज आणि चीनी ऑटोनोमस ड्रायविंग कंपनी विराइडने अबुधाबीत लेवल 4 ची संपूर्ण विनाचालक रोबोटॅक्सी सेवा सुरू केली आहे. या दोन्ही कंपन्यांमध्ये गेल्यावर्षी पार्टनरशीप झाली होती. ही सेवा अमिरात मध्य-पूर्वमधील पहिली आणि अमेरिकेबाहेर अबुधाबीसारख्या पहिल्या शहरात सुरू करण्यात आली आहे. अबुधाबीत उबर कंपनी आता पूर्णपणे ऑटोनोमस राइड देत आहे.

ही सेवा उबरएक्स किंवा उबर कम्फर्ट किंवा उबर अॅपवर नवीन ऑटोनोमस ऑप्शनद्वारे राइड बुक करता येऊ शकते. बुक करणाऱयाला विराइड रोबोटॅक्सी दिली जाऊ शकते. ही सर्व्हिस खास द्वीपवर सुरू करण्यात आली असून कारच्या आत कोणत्याही प्रकारचा चालक नसेल. राइड करताना ही कार ड्रायव्हरलेस असेल. अबुधाबीतील हायवे, एअरपोर्ट आणि अन्य रस्त्यांवरून ही कार चालकविना सुस्साट धावताना दिसेल. या कारमध्ये सुरक्षेसंबंधी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन आठवडय़ाच्या खासगी चाचणी नंतर ही सेवा 26 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. अबुधाबीतील सेवेनंतर दोन्ही कंपन्या यावर्षीच्या अखेरपर्यंत ड्रायव्हरलेस सेवा वाढवण्याची योजना बनवत आहेत. ग्वांगझोऊ येथील विराइड सध्या मध्य-पूर्वमध्ये 100 हून अधिक रोबोटॅक्सी सेवा पुरवते. ऑक्टोबर महिन्यातील विराइडला यूएईमध्ये पूर्णपणे चालकविना रोबोटॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी संघीय परमिट मिळाल्यानंतर अबुधाबीत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.

Comments are closed.