Udan Yatri Cafe will now reduce the prices of expensive items at the airport rrp


नवी दिल्ली : विमानतळावरील चहा, पाणी किंवा फराळाचे दर इतके वाढले आहेत की, सामान्य माणूस ते विकत घेण्यास धजावताना दिसतो. फक्त चहाची किंमत 200 ते 250 रुपयांपर्यंत असते आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही खूप जास्त असतात. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान हा मुद्दा उपस्थित केला होता. या समस्येवर आता तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने विमानतळावर ‘उडान यात्री कॅफे’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आता प्रवाशांना स्वस्त दरात चहा, पाणी आणि नाश्ता विमानतळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. (Udan Yatri Cafe will now reduce the prices of expensive items at the airport)

खासदार राघव चढ्ढा यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विमानतळावर मिळणाऱ्या महागड्या वस्तुंचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांनी म्हटले होते की, सरकार सर्वसामान्यांना विमान प्रवास परवडेल असा दावा करते, मात्र लोकांना चहा-पाणी महागात विकत घ्यावे लागते. त्यामुळे लोकांना समस्या निर्माण होतात. राघव चढ्ढा यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत ‘उडान यात्री कॅफे’ ही योजना सध्या कोलकाता विमानतळावर सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून विमानतळावरील फ्लाइट पॅसेंजर कॅफे स्टॉलवर कमी किमतीत खाद्यपदार्थ आणि पेये उपलब्ध करून दिली जातील.

– Advertisement –

हेही वाचा – Delhi HC On Puja Khedkar : पूजा खेडकरने देशाची प्रतिमा मलीन केली; काय म्हणाले दिल्ली उच्च न्यायालय

– Advertisement –

केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने म्हटले की, ही योजना सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. काही कालावधीनंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) इतर विमानतळांवर ही योजने लागू केली जाईल. ‘उडान यात्री कॅफे’मध्ये पाण्याच्या बाटल्या, चहा, कॉफी आणि स्नॅक्स माफक दरात उपलब्ध होणार आहेत, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळले असा विश्वास मंत्रालयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

हेही वाचा – Government scheme : सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ! काय आहे नेमका प्रकार?

दरम्यान, ‘उडान यात्री कॅफे’चा शुभारंभ करताना केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू म्हणाले की, हवाई प्रवाशांचा प्रवास अनुभव सुधारण्यासाठी, स्वस्त अल्पोपहार देण्यासाठी विमानतळावर ‘उडान यात्री कॅफे’ची व्यवस्था केली जात आहे. भारतात विमान वाहतूक क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. यामुळे एकीकडे आर्थिक विकास होत असताना, दुसरीकडे रोजगार निर्मितीलाही मदत मिळत असल्याचे राम मोहन नायडू यांनी म्हटले.


Edited By Rohit Patil





Source link

Comments are closed.