Uday Samant asserts that the glory of Marathi language should be celebrated 365 days a year
मराठी ही आपली मातृ भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दीन फक्त २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच साजरा केला जातो. भविष्यात वर्षाच्या 365 दिवस मराठी भाषा गौरव दीन साजरा झाला पाहिजे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
मुंबई : मराठी ही आपली मातृ भाषा आहे. त्यामुळे मराठी भाषा गौरव दीन फक्त २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच साजरा केला जातो. भविष्यात वर्षाच्या 365 दिवस मराठी भाषा गौरव दीन साजरा झाला पाहिजे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख दिलीप नाईक यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महापालिकेत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार समारंभ आज (28 फेब्रुवारी) सायंकाळी उत्साहात पार पडला. यावेळी उदय सामंत यांच्याहस्ते महापालिकेतील पत्रकारांना शाल आणि स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. (Uday Samant asserts that the glory of Marathi language should be celebrated 365 days a year)
कुसुमाग्रज यांच्या मराठी भाषा दीन ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यापुढे दरवर्षी दोन दिवस कुसुमाग्रज उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठी भाषेला अभिजात दर्जा हा 750 वर्षांपूर्वीच लाभलेला आहे. मात्र आता त्यावर सरकारी शिक्कामोर्तब झाले आहे, असे सांगत त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जाहीर आभार व्यक्त केले. तसेच शिवसेनेवर (उबाठा) निशाणा साधला.
हेही वाचा – मराठी : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विद्यमान आमदाराचा प्रवेश; पुण्यात पक्षाचे बळ वाढले
काही लोक मराठीवर अन्याय होऊ देणार नाही हे हिंदीतून बोलतात, असे सांगत मंत्री सामंत यांनी शिवसेनेची (उबाठा) खिल्ली उडवली आणि टीका केली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मराठी भाषा भवनाचे काम जलदगतीने सुरू करण्यात आले, असा दावा त्यांनी यावेळी केला. त्याचप्रमाणे, आधीच्या मुख्यमंत्र्यांनी ( उद्धव ठाकरे) या भाषा भवनमध्ये 40 खोल्या काढण्याचे प्रस्तावित केले होते, परंतु एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी यातील पाच खोल्या राहण्यासाठी उर्वरीत 40 खोल्या या युपीएससी, एमपीएससीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता याव्या यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Ambadas Danve : विरोधी पक्षनेतेपदावर आमचाच दावा, समर्थनाचा प्रश्नच नाही; दानवे काय म्हणाले?
Comments are closed.