Uday Samant expresses anger after meeting Vaishnavi Hagavane’s family


सासरच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीचे वडील आणि तिच्या काकांची आज (22 मे) भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हगवणे कुटुंबाबद्दल संताव व्यक्त केला.

पुणे : सासरच्या जाचाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने 16 मे रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आता राजकारण तापताना दिसत आहे. सत्ताधारी आणि विरोधक वैष्णवी हगवणे यांच्या माहेरच्या लोकांची भेट घेत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वैष्णवीचे वडील आणि तिच्या काकांची आज (22 मे) भेट घेतली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हगवणे कुटुंबाबद्दल संताव व्यक्त केला. (Uday Samant expresses anger after meeting Vaishnavi Hagavane’s family)

उदय सामंत म्हणाले की, मी आताच वैष्णवी हगवणे हिच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. मला तर वाटतं हा निचपणाचा कळस आहे. पोलिसांसोबत मी चर्चा केली आहे. त्यांनी सांगितले की, तीन जणांना अटक केली असून दोन जण फरार आहेत. त्या दोन जणांचा शोध घेण्यासाठी 6 पथक तैनात केली आहे. आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे की, पुढील काही तासाच त्या दोघांना देखील जेलमध्ये टाकण्यात आमचे पोलीस यशस्वी होतील. पण हगवणे कुटुंबीयांनी जो निघ्रूनपणा आणि नीचपणा केलेला आहे, त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. हीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. हीच भूमिका मी त्यांच्या वडिलांसोबत आणि काकांसोबत बोललो आहे. माझं मत आहे की, असं धाडस भविष्यामध्ये कोणी करू नये, अशा पद्धतीची शिक्षा या पाचही लोकांना झाली पाहिजे.

हेही वाचा – Supriya Sule : ताई म्हणतात दादांचा संबंध नाही; वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुदैवं आहे की, 10 महिन्यांचं बाळ कस्पटे कुटुंबीयांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम कायम स्वरुपी समाजावर होत असतो आणि म्हणून मी पोलिसांसोबत देखील चर्चा केली की, नुसतं पाच जणांपूर्ता तपास न करता अजून या प्रकरणात काही धागेदोरे सापडतात का? याचा देखील तपास करावा. परंतु गेलेली व्यक्ती परत येऊ शकत नसली तरी भविष्यामध्ये या घरासोबत जो फार मोठा आघात झाला आहे, तो भविष्यात कुठेही होऊ नये किंवा अशी पुनर्रावृत्ती होऊ नये, याची देखील पोलिसांनी दखल घेतली पाहिजे. त्याच पद्धतीने आमचं पोलीस डिपार्टमेंट काम करत आहे. मी देखील शासनाच्या वतीने कस्पटे कुटुंबीयांना धीर देताना सांगितलं आहे की, शासन तुमच्या आहे. परंतु ही प्रवृत्ती ठेसली पाहिजे. या नीचपणाला शिक्षा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे, असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Sushma Andhare : अकार्यक्षम ठरलेल्या महिलेला… महिला आयोगाच्या ढिल्या कारभारावरून अंधारेंचा सवाल



Source link

Comments are closed.