उदयनिधी यांची पंतप्रधान मोदींवर वादग्रस्त टिप्पणी
द्रमुक नेत्याला भाजपकडून प्रत्युत्तर
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री अन् द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष अण्णाद्रमुक-भाजप आघाडीवर जोरदार टीका करताना वादग्रस्त टिप्पणी केली आहे. सत्तारुढ द्रमुकला पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल कुठलीच भीती नाही, तसेच पंतप्रधानांचे पिता जरी तामिळनाडूत आले तरीही आम्ही घाबरणार नाही, अशी वादग्रस्त टिप्पणी उदयनिधी यांनी केली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी द्रमुकला बुद्धीहीन, नैतिकताहीन आणि मर्यादाहीन ठरविले आहे. उदयनिधी यांनी यापूर्वी हिंदूंना मृत्यूची धमकी देत हिंदूंच्या नरसंहाराबद्दल वक्तव्य केले आहे. आता उदयनिधी हे पंतप्रधानांच्या दिवंगत पित्यावरून राजकारण करत आहेत. बिहारच्या निवडणुकीदरम्यान इंडी आघाडीने पंतप्रधानांच्य आईचा अपमान केला होता अशी आठवण पूनावाला यांनी करून दिली.
Comments are closed.