‘पार्टी कुठे? चला, जलमंदिरवरच करू’, उदयनराजे-जयकुमार गोरेंच्या मैत्रीचा नवा अध्याय; साताऱ्यात न
उदयनराजे भोसले जयकुमार गोरे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी सुसंवाद आणि जिव्हाळा असलेली जोडी म्हणून ओळखले जाणारे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) पुन्हा एकदा एकत्र आले असून, त्यांच्या मैत्रीची झलक जिल्हा शासकीय विश्रामगृहावर पाहायला मिळाली.
जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात, उदयनराजेंनी मिश्कील शैलीत “पार्टी कुठे?” असा प्रश्न विचारला. त्यावर जयकुमार गोरेंनीही तेवढ्याच मिश्कीलपणे उत्तर दिलं, “चला, जलमंदिरलाच पार्टी करू!” या एका संवादातूनच दोघांमधील सुसंवादाची आणि सौहार्दाची पुनर्स्थापना झाल्याचे स्पष्ट झाले.
Udayanraje Bhosale Jaykumar Gore: उदयनराजे व जयकुमार गोरे यांच्यात सुप्त नाराजी
सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या नावाची चर्चा भाजपकडून खासदारकीसाठी होऊ लागल्यानंतर, उदयनराजे व जयकुमार गोरे यांच्यात एक प्रकारचा ‘सुप्त नाराजीचा’ सूर तयार झाला होता. यामुळे दोघेही जरी एकमेकांविरोधात उघडपणे बोलले नसले, तरी एक प्रकारचा तणाव जाणवू लागला होता.
Udayanraje Bhosale Jaykumar Gore: वाढदिवसाची पार्टी कुठे?
दुरावा मिटवण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकत, नुकत्याच झालेल्या भाजपच्या जिल्हा बैठकीत हे दोघे नेते एकत्र आले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत भाजपला सर्वाधिक जागा मिळवून पक्षाचे वर्चस्व वाढवण्याच्या उद्देशाने झालेल्या या बैठकीत खासदार उदयनराजे, मंत्री जयकुमार गोरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ. अतुल भोसले, आणि आमदार मनोज घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठक संपल्यानंतर सर्वजण एकत्र बाहेर पडले. त्याच वेळी उदयनराजेंनी गोरेंच्या खांद्यावर हात ठेवत मिश्कीलपणे वाढदिवसाची पार्टी कुठे? असा प्रश्न विचारला. त्यावर गोरेंनीही “चला, जलमंदिरवरच पार्टी करू” असं उत्तर देत माहोल हलकाफुलका केला. उदयनराजेंनी गोरेंना हलकासा चिमटा काढत मैत्रीची गोडी अधिकच वाढवली.
Udayanraje Bhosale Jaykumar Gore: भाजपच्या व्यासपीठावरून उदयनराजे-गोरे पुन्हा एकत्र
याआधी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर यांच्याशी असलेल्या संघर्षाच्या काळात उदयनराजे, गोरे आणि रणजित निंबाळकर हे तिघे एकत्र असायचे. मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उदयनराजे आणि रामराजेंमध्ये समेट झाल्यावर हे त्रिकुट काहीसे दूर झाले होते. पण आता, भाजपच्या व्यासपीठावरून पुन्हा एकदा उदयनराजे-गोरेंमध्ये मैत्रीचे सूर उमटत आहेत. स्थानिक पातळीवरील राजकारणात याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
आणखी वाचा
आमदार गायकवाड यांचा खुलासा; ती दीड कोटींची डिफेंडर कार 100 टक्के कर्जातून, नेमकी कोणाची?
आणखी वाचा
Comments are closed.