Uddhav Thackeray criticizes BJP on Kashmir issue


काश्मीर हे कालही आपलं होतं, आजही आहे आणि उद्याही आपलंच राहील. एकवेळ भाजपा देशात राहणार नाही, पण काश्मीर भारतातच राहील. आपला भाजपाला वैचारिक विरोध आहे. मात्र देशावर संकट आलं तर आम्ही पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहू. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारच, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली.

मुंबई : शिवसेना भवनात आज शिवसेना ठाकरे गटाच्या आमदार, खासदार आणि जिल्हाप्रमुखांच्या बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रश्नांवर चर्चा झाली. बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपावर टीका केली. तसेच वन नेशन वन इलेक्शन यावरही आपली भूमिका मांडली. (Uddhav Thackeray criticizes BJP on Kashmir issue)

उद्धव ठाकरे म्हणाले की, काश्मीर हे कालही आपलं होतं, आजही आहे आणि उद्याही आपलंच राहील. एकवेळ भाजपा देशात राहणार नाही, पण काश्मीर भारतातच राहील. आपला भाजपाला वैचारिक विरोध आहे. मात्र देशावर संकट आलं तर आम्ही पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहू. पण सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणारच, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी वन नेशन वन इलेक्शनवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, यासंदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे. वन नेशन वन इलेक्शनसाठी कमिटी महाराष्ट्रात असली तरी निवडणूक पारदर्शकपणे घ्या. वन नेशन वन इलेक्शन तुम्ही करत असला तरी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी प्रचारात उतरू नये, अशी मागणी ठाकरे यांनी केली.

हेही वाचा – Anjali Damania : बीडमध्ये ऑपरेशन सिंदूर राबवा; अंजली दमानिया यांनी का केली मागणी?

भाजपाच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचे जहाज बुडणारे नाही. पण भाजपाचे जहाज ओव्हरलोड झालेले आहे, त्यामुळे त्यांचे जहाज नक्कीच बुडणारे आहे. कारण अमित शहा हे तीन पक्षांचे प्रमुख आहेत. ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचेही प्रमुख आहेत. परंतु सत्ता येते-जाते. सत्ता आल्यावर हुरळून जायचे नाही आणि सत्ता गेल्यावर दु:खी व्हायचे नाही. याउलट परत सत्ता मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करायचे असतात. मात्र आपण ज्यांना खूप काही दिलं ते पक्ष सोडून जात आहेत. पण ते सोडून गेले तरी आपल्या पक्षावर काही परिणाम होणार नाही. ज्याला सोडून जायचं आहे, त्यांना जाऊ द्या. कारण कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – Sanjay Raut : बोलू का मी वर? ईडीच्या अटकेआधी राऊतांना आला होता एकनाथ शिंदेंचा फोन



Source link

Comments are closed.