दगाबाज रे! उद्धव ठाकरे यांचा बुधवारपासून शेतकरी संवाद दौरा, सरकारच्या फसव्या योजनांचा करणार पर्दाफाश
अतिवृष्टीने पिकांसह शेतकऱयांचे घरदार वाहून गेले. 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाई जमा होईल असे आश्वासन देऊनही महायुती सरकारने ते पाळले नाही. निसर्गाचा कोप आणि सरकारकडून झालेली फसवणूक यामुळे अन्नदाता बळीराजा निराश आणि हवालदिल झाला आहे. त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबरदरम्यान मराठवाडा दौरा करणार आहेत. ‘दगाबाज रे’ या शीर्षकाखाली होणाऱया या दौऱयात उद्धव ठाकरे हे सरकारच्या फसव्या योजनांचाही पर्दाफाश करणार आहेत.
मराठवाडय़ाला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. लाखो हेक्टर पिकांचा चिखल झाला. शेतं खरवडून गेली. शेतकरी उद्ध्वस्त झाला. 25 सप्टेंबर रोजी मराठवाडय़ातील पूरग्रस्त भागांचा दौरा करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला होता व त्यांना धीर दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा या भागांचा दौरा उद्धव ठाकरे करणार आहेत. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत या दौऱयाची माहिती दिली. या दौऱयात उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे व अन्य पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित असणार आहेत.
या पत्रकार परिषदेला शिवसेना राज्य संघटक चेतन कांबळे, महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने, उपजिल्हाप्रमुख विजय वाघमारे, संतोष खेंडके, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक आशा दातार, महानगर संघटक सुकन्या भोसले, विद्या अग्निहोत्री, अनिता मंत्री आदींची उपस्थिती होती.
असा असेल दौरा
गुरुवार 6 नोव्हेंबर : सकाळी 10 वाजता ः धाराशीव तालुक्यातील करंजखेडा येथील शेतकऱयांशी संवाद
- दुपारी 12 वाजता : लातूरच्या औसा तालुक्यातील भुसणी
- दुपारी 2 वाजता : अहमदपूर तालुक्यातील थोरलेवाडी
- दुपारी 4 वाजता : नांदेडच्या लोहा तालुक्यातील पार्डी
- सायंकाळी 7 वाजता भोकर येथील तलाव रिसॉर्ट येथे नांदेड व हिंगोली जिल्हा पदाधिकाऱयांसोबत चर्चा
शुक्रवार 7 नोव्हेंबर
- सकाळी 10 वाजता : नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकऱयांशी संवाद
- दुपारी 12 वाजता : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील वारंगा
- दुपारी 2 वाजता : औढा तालुक्यातील जवळाबाजार
- सायंकाळी 4 वाजता : परभणी तालुक्यातील पिंगळी स्टेशन
- सायंकाळी 7 वाजता : परभणी येथील शासकीय विश्रामगृहात परभणी लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱयांसोबत चर्चा
शनिवार 8 नोव्हेंबर
- सकाळी 10 वाजता : परभणीच्या मानवत तालुक्यातील ताडबोरगाव
- सकाळी 11.30 वाजता : सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव
- दुपारी 2 वाजता : परभणी, जालना जिह्यांत परतूर तालुक्यातील पाटोदा
- सायं. 4 वाजता : घनसावंगी तालुक्यातील लिंबोणी येथील शेतकऱ्यांशी संवाद.
- सायंकाळी 6 वाजता : सुभेदारी विश्रामगृह येथे छत्रपती संभाजीनगर-जालना लोकसभा क्षेत्र पदाधिकाऱयांसोबत चर्चा करतील.
या दौऱ्यात उद्धव ठाकरे मराठवाडय़ातील गावागावांत जाऊन चावडी, पारावर बसून शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत. सरकारने जाहीर केलेले पॅकेज, नुकसानभरपाईची रक्कम मिळाली की नाही याची माहिती ते घेणार आहेत.
5 नोव्हेंबर
- छत्रपती संभाजीनगर येथून दौऱयाला प्रारंभ. सकाळी 10 वाजता – पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱयांशी संवाद
- सकाळी 11.30 – बीड तालुक्यातील पाली
- दुपारी 2 वाजता – धाराशीवच्या भूम तालुक्यातील पाथ्रुड
- दुपारी 3.30 वाजता – परंडा तालुक्यातील शिरसाव
- सायंकाळी 5 वाजता – सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील घारी
- सायंकाळी 7 वाजता – धाराशीव येथील शासकीय विश्रामगृहात धाराशीव, बीड, लातूर जिह्यांतील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा
Comments are closed.