कॉक्रोचना कमी लेखू नका, सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल; दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात उद्धव ठाकरे यांचे निवेदन
नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे दिल्लीत जंतरमंतर येथे निदर्शने सुरू आहेत. या आदोलनाच्या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक निवेदन जारी केले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
दिल्लीतील तरुणांच्या आंदोलना संदर्भात पुढील निवेदन जारी केले आहे:“दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोच चे आंदोलन सुरू झाले आहे.
ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात…— संजय राऊत (@rautsanjay61) 6 जून 2026
दिल्लीच्या जंतरमंतरवर कॉक्रोचचे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यांना आपण देशाचे भाग्यविधाते, भवितव्य म्हणतो, ते हजारो तरुण आपल्या वेदना व भविष्याची चिंता घेऊन रणरणत्या उन्हात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांना ‘कॉक्रोच’ म्हणून हिणवणे व न्याय नाकारणे योग्य नाही. NEET पेपरफुटीने लाखो युवा वर्ग उद्ध्वस्त झाला आहे. असे सर्व पीडित तरुण-तरुणी कॉक्रोच बनून आक्रोश करीत आहेत. सरकारला त्यांचे म्हणणे ऐकावेच लागेल. कॉक्रोचना कमी लेखू नका, हा इशारा जंतरमंतरवरील आंदोलनाने दिला आहे!, असे उद्धव ठाकरे यांनी निवेदनात म्हटले आहे.
Comments are closed.