उपकार मोजायचे नसतात, करायचे असतात, अमित शाह यांना बाळासाहेबांनी मदत केली का? काय म्हणाले ठाकरे?

उधव ठाकरे: मला जर कोणी विचारले की, अमित शाह तुमच्या घरी आले होते का? त्यांनी बाळासाहेबांकडे मदत मागितली होती का? तर मी म्हणेण मला आठवत नाही.  उपकार मोजायचे नसतात. ते करायचे असतात असे मत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केले. उकराची फेड की कृतज्ञतेने करायची की अपकाराने करायची हे ज्याचे त्याने ठरवायचे असते असेही ठाकरे म्हणाले. हुकूमशाह कोणाही असला तरी त्याला एक ना एक दिवस जावं लागणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. काही माणसं कायमची सोबत राहतात. काही संधीसाधू असतात असा टोला देखील ठाकरेंनी शिवसेना शिंदे गटाला लगावला.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार ज्येष्ठ लेखक/कवी जावेद अख्तर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशन झालं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग हे पुस्तक वाचल्यावर लोकांची तुरुंग या शब्दाची भीती निघून जाईल असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अमित शाह तुम्ही आम्हाला कशासाठी एवढा दुश्मन समजताय?

अमित शाह तुम्ही आम्हाला कशासाठी एवढा दुश्मन समजताय? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. आम्ही विरोधी विरोधी म्हणजे कोणाचे विरोधी. आमचे आणि तुमचे मते पटत नाहीत. आमचं हिंदुत्व हेदेशासाठी आहे. हे म्हटल्यानंतर तुम्ही आम्हाला दुश्मनाच्या पिंजऱ्यात उभे करताय. पाकिस्तानपेक्षा आधी आम्हाला खतम करा असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत आहात. हा काही पहिला प्रयत्न नाही शिवसेनेला संपवण्याचा. याआधी रजनी पटेल यांनी 1995 साली सांगितलं होतं की, शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करा, नाहीतर तुम्हाला तुरुंगात टाकावं लागेल. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगितलं होतं की, ज्या क्षणी तुम्ही मला तुरुंगात टाकाल, त्याक्षणी बाहेर तुमची अंतयात्रा निघेल.

शिवसेनाप्रमुख आपली सर्वांची परीक्षा घेत आहेत

काही माणसं कायमची सोबत राहतात. काही संधीसाधू असतात असे ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुख आपली सर्वांची परीक्षा घेत आहेत. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखा जगा असे शिवसेनाप्रमुखांनी सांगितले. शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला आत्मविशावस दिला. दुसऱ्याला आनंद देता नाही आलं तरी चालेल पण त्रास तरी देऊ नये असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ही मराठी माणसांचे हित जपते म्हणून शिवसेनेवर वरवंटा फिरत असल्याचे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. आज लोकशाही मानायची की नाही असे झाले आहे. हुकुमशाह कोणीही असला तरी त्याला एक दिवस जावेच लागणार आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत हे शंभरहून अधिक दिवस आर्थर रोड तुरुंगात अटकेत असताना तत्कालीन अनुभव आणि अनेक राजकीय गुपित या पुस्तकात संजय राऊत यांनी मांडली आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन होण्यापूर्वीच सत्ताधारी पक्ष आणि नेत्यांकडून याची खिल्ली उडवण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=qpyukaept8w

महत्वाच्या बातम्या:

Uddhav Thackeray: आमचं जहाज बुडणार नाही, भाजप ओव्हरलोड झालाय, बुडण्याची भीती त्यांनाच: उद्धव ठाकरे

अधिक पाहा..

Comments are closed.