एकनाथ शिंदेंकडून साहेब असा उल्लेख; उद्धव ठाकरे म्हणाले, काहीजण बोलत होते…, विधान परिषदेतील नि

Uddhav Thackeray And मराठी Speech Video: माजी मुख्यमंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानं त्यांना काल राजकीय निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहात राजकीय कोपरखळ्या आणि तुफान शाब्दिक फटकेबाजी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे एकेकाळचे सहकारी एकनाथ शिंदे (मराठी) यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंचा उल्लेख साहेब म्हणून केला. तर उद्धव ठाकरेंचा स्वभाव राजकीय नसल्याचं सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शेरोशायरीतून राजकीय कोपरखळ्या मारल्या.

विधान परिषदेतील नऊ सदस्य निवृत्त होत असून त्यांच्या निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी सर्वांच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं. यावेळी विधानपरिषदमधील भाषणात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंचं पहिलं नाव घेत, उद्धव ठाकरेसाहेब निरोप घेत आहेत. त्यांना निरोगी आयुष्य लाभो. त्यांच्या राजकीय आयुष्याला खूप शुभेच्छा, असं म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदेंचं भाषण सुरु असताना उद्धव ठाकरे सभागृहात उपस्थित नव्हते. यावेळी निरोप समारंभाला चांगलं बोलायचं असत. काहीजण सभागृहात पुन्हा भेटतील, काही जण फिल्डवर काम करताना भेटतील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदेंचं भाषण संपत असताना उद्धव ठाकरे सभागृहात हजर झाले. एकनाथ शिंदेंच्या या भाषणावर उद्धव ठाकरेंनी मिश्किल टोला मारल्याचे दिसून आले. (मराठी On Uddhav Thackeray)

उद्धव ठाकरेंचा भाऊ? (उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर)

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, मुख्यमंत्रीजी मी जेव्हा सभागृहात आलो, तेव्हा तुमच्या आधी काहीजण बोलत होते ते मी थोडं ऐकलं, की कुठेतरी भेटू…मी तुम्हाला (देवेंद्र फडणवीसांना) थोड्यावेळाने भेटायला येणार आहे. पण काहीजणांना रणांगणात, काहीजणांना कुठे…आणि काहीजणांना असं वाटतं की आता इथे भेटलात..(हात जोडून), अशी काही लोक आहेत. असो…या सभागृहात मी सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्यासोबत इतर सदस्य देखील निवृत्त होतायत, त्यांना देखील शुभेच्छा देतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. (Uddhav Thackeray On मराठी)

विधान परिषदेतील पुढील 9 आमदारांचा कार्यकाळ संपला-

  1. उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
  2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)
  3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
  4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
  5. गोपीचंद पडळकर (भाजप)
  6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
  7. राजेश राठोड (काँग्रेस)
  8. प्रवीण दटके (भाजप)
  9. रमेश कराड (भाजप)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस- (Maharashtra Budget Session 2026)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी केलेल्या सर्वच आरोपांना मुख्यमंत्री उत्तर देतील. त्यामुळे अशोक खरात प्रकरण, कायदा व सुव्यवस्था, शेतकरी तसेच अजितदादांचं अपघाती निधन या सर्वच मुद्यावर मुख्यमंत्री आज उत्तर देताना पहायला मिळतील. दरम्यान सभागृहातील भाषणांनंतर मुख्यमंत्र्यांची दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषदही पार पडणार आहे.

संबंधित बातमी:

मराठी : उद्धव ठाकरेसाहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा, निरोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे भरभरुन बोलले!

आणखी वाचा

Comments are closed.