मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही? उद्धव ठाकरेंना ‘माझा’चा सवाल, ठाकरे म्हणाले…

Uddhav Thackeray On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज (29 ऑगस्ट) सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास सुरुवात केली आहे. राज्यभरातून विविध मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. याचदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली.

मराठ्यांना आतापर्यंत वापरुन घेतलं. न्याय मागण्यासाठी मराठी माणूस सूरतला जाणार का?, मराठी माणूस न्याय मागण्यासाठी मुंबईतचं येणार, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबई मराठी लोकांची राजधानी आहे. आंदोलक दहशतवादी नाहीत, मराठी माणसं आहेत. सत्ता आल्यास काही दिवसांत न्याय देऊ म्हणणारे आता सत्तेत आहेत. मराठ्यांना देण्यासाठी माझ्या हाती काही नाहीय.युतीमध्ये सध्या घमासान चालू आहे. सरकारने हा प्रश्न सोडवला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही?, उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की नाही?, असा प्रश्न एबीपी माझाकडून उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर या सगळ्या गोष्टी आरक्षण देऊ हे ज्यांनी सांगितले होते त्यांना विचारले पाहीजे. मी काही बोललो तरी ते काय करतील…, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठ्यांना आतापर्यंत फसविण्यात आले. छत्रपती  शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणार असे सांगण्यात आले होते. ही सगळी जबाबदारी सरकारची आहे. मी याआधी जरांगे यांच्या समोर माझी भूमिका मांडलेली आणि मी काही ही बोललो तरी सरकार काय करणार हे महत्त्वाचे, असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,

2. हैदराबाद गांजेटियरने अंमलात आणले …साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

https://www.youtube.com/watch?v=mjyl_opbzhc

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil: आझाद मैदान फुल्ल, मोठी वाहतूक कोंडी; मनोज जरांगे मुंबईत पोहोचताच सरकारचा मोठा निर्णय

Manoj Jarange Mumbai Morcha: 2 तासांत मुंबई रिकामी करा…; आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे असं का म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.