भोंदू बाबासोबत त्याच्या राजकारणात असलेल्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची मागणी

शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार समितीतर्फे सुरू होणाऱ्या एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी या कोर्सचे महत्त्व सांगितले. तसेच राज्यातील एपस्टीन म्हणून गाजत असणाऱ्या अशोक खरात प्रकरणाचा उल्लेख करत राज्यातील राजकारण अजून किती खालच्या पातळीवर नेणार आहात? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. तरीही अशा गोष्टी राज्यात घडत आहेत. राज्याचे राजकारण अजून किती खालच्या पातळीवर नेणार आहे, असा प्रश्न उपस्थित राहतो. महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्याचे पालन करणारेच भोंदू बाबाच्या नादी लागणार असतील तर अशा बाबांसोबत त्यांच्या राजकारणात असलेल्या भक्तांवरही कारवाई झाली पाहिजे. या गंभीर विषयांवरून महाराष्ट्राच्या एपस्टीन प्रकरणावरून कोणाचेही लक्ष उडू नये, यासाठी दुसरा विषय सुरू होऊ नये. त्यामुळे जादूोणा विरोधी कायद्याचे कठोरतेने पालन होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

अनेक नेते आणि मराठी यांचे भोंदू बाबासोबतचे फोटो उघड झाले आहेत. त्यामुळे कर्तृत्वशून्य नेत्यांना असे मार्ग अंवलंबावे लागतात, हेच यातून दिसून येते. त्यांना अशा भाकड आणि भोंदूगिरीचा आसरा घ्यावा लागतो. असे नेते भोंदू आणि भाकड आहेत, त्यांचे काहीच कर्तृत्व नाही, हेच दिसत आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. एक सगळ्यांच्या पापावर पांघरून घालणारे खाते मुख्यमंत्र्यांनी सुरू करावे आणि त्यांनी ते खाते स्वतःकडेच ठेवावे, असा टोलाही त्यांनी हाणला.

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष 23 जानेवारीपासून सुरू झाले आहे. मराठी माणसांसाठी आणि भूमिपुत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत आहे, असे आपण जाहीर केले होते. गेल्या 60 वर्षांपासून अनेक क्षेत्रात मराठी माणसाला, स्थानिक भूमिपुत्रांना दरवाजे बंद होते. त्यासाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. स्थानीय लोकाधिकार, भारतीय कामगार सेना, बँक कर्मचारी सेना अशा अनेक सेनांची स्थापना केली. मराठी माणसासाठी आंदोलने करत तरुणांसाठी प्रशिक्षण वर्गही सुरू केले. आंदोलन केल्यानंतर त्या ठिकाणी नोकरी आणि रोजगाराची संधी उपलब्ध झाली तर त्यासाठी कुशल तरुण आपल्याकडे पाहिजे, त्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्या जागांसाठी पात्र होण्यासाठी तरुणांनी शिक्षण देणे, या हेतूने हे वर्ग सुरू केले.

आता काळ बदलत आहे. आताच्या काळात एक्सपोर्ट- इम्पोर्ट, त्याला लागणारे लॉजिस्टिक हे मोठे क्षेत्र तयार झाले आहे. नवनवे एअरपोर्ट, पोर्ट तयार होत आहे. तिथे अनेक संधी निर्माण होत आहेत. त्या संधी आपण गमवता कामा नये. हे सर्व तज्ज्ञ आहेत. या क्षेत्रात अनेक वर्ष कार्यरत आहे. ते तरुणांना या क्षेत्रात संधी देऊ शकतात. त्यासाठी कुशल तरुणांची गरज आहे. त्यासाठी शिवसेना आणि लोकधिकार समितीतर्फे याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सुरुवातील प्रवेश परीक्षा घेत 25-30 जणांची बॅच असेल. त्यांना पमाणपत्र मिळाल्यावर त्यांना नोकरीची संधी हमखास मिळणार, अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे.

आपला देश आर्थिक महासत्ता होण्याचे स्वप्न सरकार दाखवत आहे. मात्र, आपण तरुणांना या नव्या क्षेत्रात प्रशिक्षित केल्यास महाराष्ट्र देशाच्या विकासाला हातभार लावेल. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. आपल्या क्षमतांचा वापर केला तर हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. त्यामुळे हे वर्ग राज्यभरात सुरू करण्याची आमची योजना आहे. हे वर्ग आणि प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांची संख्या वाढेल तसे या क्षेत्रात आपण अग्रेसर होणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

या कोर्सबद्दल माहिती देताना शंतनु भडकमकर म्हणाले की, तरुणांना प्रशिक्षण देण्याची ही संधी दिल्याबद्दल शिवसेना आणि स्थानीय लोकाधिकार समितीचे धन्यवाद, आज या सेक्टरमध्ये कौशल्यवान तरुणांची गरज आहे. ही एक नॉलेज इंडस्ट्री आहे. त्यामुळए या क्षेत्रात भरपूर संधी असल्याने या संधी वाढत आहे. तसेच आपल्या लोकांची जगभर ऑफीस तयार होत आहे. त्यामुळे संधी वाढत आहे. मात्र, शिकण्याची आणि अभ्यासाची तयारी पाहिजे. त्यासाठी लोकाधिकार समितीने पुढाकार घेतला आहे. यात प्रवेश घेताना प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. याची सुरुवात 25 ते 30 जणांच्या बॅचने होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Comments are closed.