शिवतीर्थावर भाऊबीज साजरी होणार; आदित्य-तेजस ठाकरे उपस्थित राहणार, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंचीह
उद्धव ठाकरे राज ठाकरे: दिवाळीचा (Diwali 2025) सण आणि विशेषतः भाऊबीजेच्या मुहूर्ताच्या (bhaubij 2025) पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा ठाकरे कुटुंब एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) या दोघांमध्ये भाऊबीजेच्या निमित्ताने शिवतीर्थवर भेट होण्याची शक्यता असून, या कौटुंबिक भेटीमुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.
उद्धव ठाकरे बुधवारी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थवर दाखल झाले होते. राज ठाकरे यांच्या मातोश्री मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे शिवतीर्थवर गेले होते. आज पुन्हा एकदा भाऊबीज निमित्ताने ठाकरे कुटुंबाची भेट होण्याची दाट शक्यता आहे.
या भेटीत आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि अमित ठाकरे यांना एकमेव बहीण उर्वशी ठाकरे असल्याने यंदाची भाऊबीज ही शिवतीर्थवर साजरी होणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच उद्धव ठाकरे हे जयजयवंती ठाकरे-देशपांडे यांच्या घरी भाऊबीजेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे राज ठाकरे: कौटुंबिक स्नेहबंधांमुळे राजकीय चर्चांना उधाण
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही गेल्या काही महिन्यांत आठ भेटी झाल्या आहेत. दोघांमधील या स्नेहभेटी कौटुंबिक कारणांमुळे होत असल्या तरी प्रत्येक भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग मिळत आहे. ठाकरे बंधूंनी अद्याप राजकीय युतीची औपचारिक घोषणा केलेली नसली, तरी दोघांच्या सलग भेटींमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये “ठाकरे पुन्हा एकत्र येणार का?” या चर्चेला उधाण आले आहे. आता भाऊबीजेच्या मुहूर्तावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची नववी भेट होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरे राज ठाकरे: अलीकडील ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी
1. 5 जुलै 2025: मराठीच्या मुद्यावर दोघे ‘विजयी मेळाव्यात’ एकत्र आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी “एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी,” असे म्हटले होते.
2. 27 जुलै 2025: उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे मातोश्रीवर भेटले.
3. 27 ऑगस्ट 2025: गणेशोत्सवाच्या काळात उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले.
4. 10 सप्टेंबर 2025: उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल देसाईंसह राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भेटले.
5. 5 ऑक्टोबर 2025: संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशात दोघे पुन्हा एकत्र दिसले.
6. 12 ऑक्टोबर 2025: ठाकरे कुटुंबीयांचा स्नेहभोजन कार्यक्रम शिवतीर्थवर पार पडला.
7. 17 ऑक्टोबर 2025: मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
8. 22 ऑक्टोबर 2025: उद्धव ठाकरे पुन्हा शिवतीर्थवर पोहोचले.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या, पाहा Video
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.