मुंबई दंगल प्रकरण : माफी मी नाही अटलजींनी मागितली होती – उद्धव ठाकरे
मुंबई दंगलीत सामील झालो म्हणून उद्धव ठाकरे यांनी माफी मागितल्याच्या खोट्या बातम्या काही जणांनी व्हायरल केल्या होत्या. त्या बातम्या पसरवणाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांनी अंधेरीतील मेळाव्यात खरपूस समाचार घेतला.
”’92 च्या दंगलीसाठी मी माफी मागितली असं खोटं पसरवलं होतं. कधी माफी मागितली कोणाकडे माफी मागितली? माफी मागितली हे जर खरं असेल तर ती माफी उद्धवजींनी नाही तर अटलजींनी मागितली होती. Babari WAS A Terrible mistake हे उद्धव ठाकरे नाही तर लालकृष्ण आडवाणी म्हणाले होते. आडवाणी अजूनही आहे अमित शहा यांनी जाऊन त्यांना विचारावं. नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक उद्धव ठाकरेंनी नाही तर तुमच्या नरेंद्रभाई मोदींनी खाल्ला होता. लहानपणी आमच्या शेजारी मुसलमान कुटुंबं राहायची, ईदच्या दिवशी आमच्या घरी त्यांच्याकडून मला जेवण यायचं आणि मी त्यांच्या ताजे खालणं जायचो हे उद्धव ठाकरे नाही तर नरेंद्र मोदी बोलले होते. किती काढू. सगळे जण टोप्या घालून बसले आहेत. मोहन भागवत मशिदीत गेले होते उद्धव ठाकरे गेलेले नाहीत, असा जोरदार घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
Comments are closed.