नीलम गोऱ्हेंचा जुना ऋणानुबंध लक्षात घेत त्या गप्प आहेत, अन्यथा..; किशोर तिवारींचा प्रहार सुरूच!
नागपूर बातम्या: चांडाळ चौकडीने जास्त बोलू नये, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या तसाच माझाही अनुभव आहे. पैसे घेऊन पद दिली जायची, तानाजी सावंत यांचे ही उदाहरण आहे. अनेक लोक गुरुदक्षिणेचा उल्लेख करायचे. कशाला प्रिंटरच्या बॉक्समध्ये रोलेक्स घड्याळ आणि डायमंडचे नेकलेस घ्यायचं. याद राखा नीलम गोऱ्हे जुना ऋणानुबंध लक्षात घेऊन गप्प आहेत. त्यांना डीवचलं तर ते सर्व काही बाहेर आणतील. असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे माजी प्रवक्ते किशोर तिवारी (Kishore Tiwari) यांनी विनायक राऊत (Vinayak Raut) , अरविंद सावंत (Arvind Sawant), मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर गंभीर आरोप करत पुन्हा ठाकरे गटावर तोफ डागली आहे.
नीलम गोऱ्हे 25 वर्षापासून शिवसेनेत होत्या. त्यांना मातोश्रीचा तगडा अनुभव आहे. नीलम गोऱ्हे यांनी कधीच काही भेट दिली नसावी. मात्र उद्धव ठाकरे स्पष्ट वक्ते आहेत, कोणी मर्सिडीज दिली, तर उद्धवजी बोलायचे आपल्याला मर्सिडीज आली. त्यामुळे शिवसेनेमधील चांडाळचौकडीच्या लोकांनी जास्त खुलासे करायला नको.
माझाही अनुभव, पैसे घेऊन तिथे पद दिली गेली- किशोर तिवारी
नीलम गोरे म्हणाल्या गाड्यांच्या बदल्यात पदं दिली जातात, तर माझाही अनुभव आहे की पैसे घेऊन तिथे पद दिली गेली. तानाजी सावंत यांचा महायुतीच्या पहिल्या कालावधीतलं मंत्रिपद त्याचे उदाहरण आहे. तानाजी सावंत यांनीच मला ही गोष्ट सांगितली होती. ज्यांनी ज्यांनी पैसे दिले, तेच लोक बोलतात की इथे गुरुदक्षिणा द्यावी लागायची, आणि ही संस्कृती बदला हे मी म्हणालो तर मला पद मुक्त केलं. लक्षात ठेवा पक्षाची परिस्थिती आज तशी नाही. तुम्ही कमांडिंग आणि डिमांडिंग पोसिशनमध्ये नाही. ज्यांची विचारांशी निष्ठा नाही, अशा लोकांना जमा करायचं आणि त्यांच्याकडून चार्ज वसूल करायचं पद द्यायचे, ही संस्कृती बदलण्याची गरज आहे.असेही किशोर तिवारी म्हणालेत.
चांडाळ चौकडी म्हणजे संजय राऊत नाही – किशोर तिवारी
चांडाळ चौकडीचे लोक पैसे गोळा करायचे. घरची मंडळी ही सक्रीय झाली होती. कशाला गिफ्ट घ्यायचं, प्रिंटरच्या बॉक्समध्ये, रोलेक्सच्या घड्याळाचा स्वरूपात, डायमंडचे नेकलेसच्या स्वरूपात हे सर्व टाळायला पाहिजे होत. कारण जे लोक अशी गिफ्ट देतात ते वाईट उद्दिष्टाने आपल्या जवळ येतात आणि फायदा करून घेतात हे लक्षात घ्यायला हवं. चांडाळ चौकडी म्हणजे संजय राऊत नाही. संजय राऊत यांचं त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही, ते अशा गोष्टीत सहभागी होत नव्हते. मात्र विनायक राऊत, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर, सुषमा अंधारे हे त्या संस्कृतीचे आहेत. आणि हे लोक नीलम गोऱ्हेच्या विरोधात बोलत आहे. त्या बाईचा कर्तृत्व किती आहे हे लक्षात घ्या. असेही किशोर तिवारी म्हणाले.
जुना ऋणानुबंध लक्षात घेता नीलम गोऱ्हे शांत आहेत, अन्यथा..- किशोर तिवारी
नीलम गोऱ्हे पक्ष सोडून गेल्या, त्यामुळे त्यांनी बोलायला नको होतं. मात्र मी तर पक्षात आहे त्यामुळे मी बोलेन. मी सांगितले तर मला पदमुक्त केलं, तुम्हाला (उद्धव ठाकरे) आत्मचिंतन करायची गरजच नाही, असे वाटते. किशोरी पेडणेकर या बीएमसीमध्ये असताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरण गाजली. सुषमा अंधारे या लोकांनी नीलम गोऱ्हे विरोधात बोलू नये. नीलम गोऱ्हे म्हणाल्या मी दिलेले नाही, मात्र माझा अनुभव तसा आहे. याद राखा नीलम गोऱ्हे आपला जुना ऋणानुबंध लक्षात घेऊन फार काही बोलत नाहीये. मात्र त्यांना वारंवार डिवचले, तर त्या सर्व काही बाहेर काढतील. मग तुमची किती अडचण होईल. नीलम गोऱ्हे सुरतला, गुवाहाटीला किंवा गोव्याला गेल्या नव्हत्या, त्यांचा टोकाचा अपमान झाला, त्यानंतर त्या पक्ष सोडून गेल्या. असेही किशोर तिवारी म्हणाले.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.