Uddhav Thackeray Shivsena UBT criticized BJP and Mahayuti Government
मुंबई : मुंबईमधील षण्मुखानंदमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला. यावेळी “चिन्ह चोरले, वडील चोरले तरीही उद्धव ठाकरे संपत कसे नाही? हा विरोधकांना पडला असेल. शिवसेना तरुणच आहे, आणि शिवसेना तरुणच राहणार आहे. आज पैसा फेको तमाशा देखो असा शिंदेंचा मेळावा आहे. ज्यांना राजकारणात पोर होत नाही, ते आमच्या घराणेशाहीवर टीका करतात.” असे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर टीका केली. आपल्या वर्धापन दिनावर भाजपची पाळलेली बेडंक बोलतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर टीका केली. (Uddhav Thackeray Shivsena UBT criticized BJP and Mahayuti Government)
हेही वाचा : Uddhav Thackray on Raj Thackeray : जनतेच्या जे मनात तेच होणार, त्या युतीवर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत, ते आमच्यावर टीका करतात. अरे तुला पोरं होत नाहीत. आम्ही काय करू? भाजपचे लोक असेच आहेत. आपण सत्य नाकारतो का कधी? त्यांना आजपर्यंत कधी पोरं झाली नाही. म्हणून दुसरे नेते स्वीकारायचे आणि त्यांना मोठे करायचे. दुर्देव असे की ज्या सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली. त्याच सरदार पटेलांचा सर्वात मोठा पुतळा उभारला. हे यांचे हिंदुत्व. भाजपने पाळलेली बेडके आज डराव डराव करतील. ही पाळीव बेडके डोळ्यासमोर येतात. या चोरांना खरंच मी म्हणेल लाज लज्जा शरम ठेवली नाही. नॅपकिन का ठेवला? ते ही कळत नाही. असा हा भाजप पक्ष.” असे म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.
“निवडणूक जिंकण्यासाठी माता भगिनीशी केलेला वादा, जनतेशी केलेला वादा पाळत नाही. मग तो पक्ष माझ्याशी केलेला वादा कसा पाळतील? अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा वादा नव्हता म्हणतात. मग माता भगिनीला केलेला वादा खरा होता की नव्हता?” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. “केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचे छत गळत आहे, विमान अपघात झाला, रेल्वे अपघात झाला कोणी जबाबदारी घेत नाही. मेट्रोमध्ये पाणी भरले. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे, पण हे भाजपचेच पंतप्रधान आहेत, देशाचे नाहीत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडाला संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंघांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.
Comments are closed.