आमची लढाई निवडणूक आयोगाशी! सरकार व भाजप त्यांचा बचाव का करतेय? उद्धव ठाकरे यांचा खरमरीत सवाल

निवडणूक आयोगाच्या ‘मत चोरी’ विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चाला अडवून दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत यांना ताब्यात घेतले. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग व भाजप वर सडकून टीका केली. आमची लढाई निवडणूक आयोगाशी! सरकार व भाजप त्यांचा बचाव का करतेय? असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

https://www.youtube.com/watch?v= wxjyk4qs5c

आज दादरच्या शिवतीर्थावर महायुतीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात शिवसेनेने आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे उपस्थित होते. या आंदोलनानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दिल्ली व महाराष्ट्रातील घडामोडींवरून राज्य व केंद्र सरकारला धारेवर धरलं.

Comments are closed.