भाजप आणि संघ आता भाषिक प्रांतवादाचं विष पसरवतायत, उद्धव ठाकरे यांची टीका

भाजप आणि संघ आता भाषिक प्रांतवादाचं विष पसरवतायत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे बोलताना केले. डोंबिवली कल्याण येथील काही भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधूंन त्यांचे पक्षात स्वागत केले.

” हल्ली रोज आपल्या पक्षात प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातोय पण ही गर्दी नाही. लढणाऱ्या शिवसैनिकांचे हे सैन्य आहे. हळू हळू सगळ्यांना लक्षात यायला लागलं आहे की भाजप किती गद्दार किती ढोंगी आहे. ही लढाई सोपी नाही. डोळे उघडे ठेवून बघा. भाजप हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपने जसे पक्ष फोडले तसे आता ते घरं देखील फोडायला बघतायत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

”भाजपचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे. पालघरमध्ये साधू हत्याकांड झालं त्यावेळी ज्यांच्यावर भाजपने आरोप केले होते. त्यांनाच भाजपने दोन दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश दिला. त्यांना वाटलं की त्यांचं हे पाप लपलं जाईल. पण ते चव्हाट्यावर आल्यावर त्यांनी त्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिली. आता हे लोकं भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले आहे. भाषेवरून कुणाचे खून करा, मारा अशी आपली भूमिका नाही. कोणत्याही भाषिकाने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये. हा भाषिक प्रांतवाद पण यांनी सुरू केला. यांचा मागाठाणे मधला आमदार मराठी माझी आई आहे आणि आई मेली तरी चालेल असं बोलतो त्याचं काय करायचं. घाटकोपरमध्ये संघाचे जोशी बोलतात माझी मातृभाषा गुजराती. हे भाषा प्रांतावादाचं विष भाजप संघ पसरवतंय. तोडा, फोडा आणि राज्य करा हे पसरवतायत. आपल्याला आपल्या राज्याला भूमीपुत्रांना सांभाळतंय आणि तुम्हाला खात्री पटली आहे की हे काम शिवसेनाच करू शकते”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Comments are closed.