Uddhav thackeray slams eknath shinde over khoke and gaddar in marathi
पूर्वीचा तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय? शेतकऱ्यांच्या घामातून व 107 हुतात्म्यांच्या रक्तातून दिमाखात उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवायचा तर मराठी जनतेला पुन्हा एकदा लढावेच लागेल. महाराष्ट्रधर्म जागवावाच लागेल, असेही ते म्हणाले आहेत.
Thackeray On Maharashtra Din : मुंबई : देशावर युद्धाचे सावट आले असतानाच आज 65व्या महाराष्ट्र दिनाचा सोहळा साजरा होतो आहे. मात्र, आज तो कणखर महाराष्ट्र दिसत नसल्याची खंत ठाकरेंच्या शिवसेनेने व्यक्त केली आहे. उद्यमशील व प्रगत राज्य ही कधीकाळी महाराष्ट्राची ओळख होती. पण हे ‘भूषण’ पुसून कर्जबाजारी व शेतकरी आत्महत्यांचे राज्य असे ‘दूषण’ आज महाराष्ट्राला मिळत असेल तर ते वाईट आहे, असे ठाकरे यांनी ‘सामना’ या मुखपत्रातील अग्रलेखात म्हटले आहे. (uddhav thackeray slams eknath shinde over khoke and gaddar)
मुळात महाराष्ट्रधर्म म्हणजे काय हेच ही मंडळी दिल्लीच्या नादी लागून विसरल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. महाराष्ट्र धर्मापेक्षा सत्ता, पदे आणि खुर्च्या यांना मानाचे स्थान मिळाल्यावर दुसरे काय होणार, असा सवालही त्यांनी केला आहे. गद्दारी, बेइमानी तसेच खाल्ल्या ताटात माती कालवणाऱ्या बेइमानीच्या विकृतीला महाराष्ट्रधर्मात कधीच स्थान नव्हते. पण अलीकडे ‘गद्दारी’ आणि ‘खोके’ यांसारख्या शब्दांनाच महाराष्ट्रात राजमान्यता मिळाली तिथे महाराष्ट्र धर्माचे गोडवे कुणी गायचे? महाराष्ट्रधर्माशी बेइमानी करून याच राज्यातील काही लोक दिल्लीचे मिंधे झाले. या घरभेद्यांनी आधी दिल्लीच्या इशाऱ्यावर फंदफितुरी करत महाराष्ट्र आणि मराठी जनतेच्या विश्वासाला धोका दिला. त्यानंतर मराठी जनतेचा प्रामाणिक कौल व महाराष्ट्राचे जनमत झुगारून कृत्रिम बहुमताच्या जोरावर दिल्लीच्या तालावर नाचणारे व जनतेला नको असणारे कृत्रिम सरकार महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले, असा संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : सरकार मोदींचं आणि सिस्टम राहुल गांधींची; संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला लावलेली ती चूडच होती. हा महाराष्ट्रद्रोहच होता व त्याचे विस्मरण मऱ्हाटी जनतेने कदापि होऊ देऊ नये. किंबहुना महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्या गद्दारांचा तसेच त्यांचा वापर करून घेणाऱ्या दिल्लीश्वरांचा हिशेब कसा चुकता करायचा याचा संकल्प मराठी जनतेने सोडायला हवा. तोच महाराष्ट्रधर्म आहे! बेइमानी करून जी सत्ता मिळवली ती तरी ही मंडळी जनतेच्या कल्याणासाठी वापरत आहेत काय? तर तसेही नसल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. निवडणुकीपूर्वी घोषणांचा पाऊस पाडायचा आणि निवडून आल्यानंतर मात्र ते सोयीस्कररित्या विसरायचे, या द्रोहाला महाराष्ट्रधर्मात स्थान नाही, असेही त्यांनी ठणकावले आहे.
हेही वाचा – Uddhav Thackeray : तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय, महाराष्ट्र दिनी ठाकरेंचा सवाल
पूर्वीचा तो कणखर महाराष्ट्र आज राहिला आहे काय? शेतकऱ्यांच्या घामातून व 107 हुतात्म्यांच्या रक्तातून दिमाखात उभ्या राहिलेल्या महाराष्ट्राचा लौकिक कायम ठेवायचा तर मराठी जनतेला पुन्हा एकदा लढावेच लागेल. महाराष्ट्रधर्म जागवावाच लागेल, असेही ते म्हणाले आहेत.
Comments are closed.