Uddhav Thackeray targets BJP with Raj Thackeray
राज ठाकरे यांना निवडणूक निकालाबाबत पडलेले प्रश्न हे महाभारतातील यक्षप्रश्नांप्रमाणे आहेत. महाभारतातील युधिष्ठर आणि यक्ष यांच्यातील प्रश्न-उत्तरे आणि संवाद जितका मोहक आहे, तितकेच राज ठाकरे यांना पडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना फडणवीस यांच्याकडून मिळणारे उत्तरही कदाचित रंजक असेल.
(Uddhav Vs Raj) मुंबई : ईव्हीएम घोटाळ्यामुळे भारतीय निवडणूक म्हणजे लोकशाहीच्या नावाने सुरू झालेला एक ‘फार्स’ ठरत आहे. बाळासाहेब थोरात यांच्यासारखा काँग्रेसचा मोहरा पराभूत होईलच कसा? हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेला प्रश्न योग्यच आहे. एकमेव खासदार असलेल्या अजित पवार यांचे 42 आमदार कसे काय? किंवा 8 खासदार असलेल्या शरद पवारांना फक्त 10 आमदार? हे प्रश्न जनतेच्या मनातले, पण बराच काळ विचार केल्यानंतर हेच प्रश्न राज ठाकरे यांनाही पडले आहेत, अशी बोचरी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Uddhav Thackeray targets BJP with Raj Thackeray)
राज ठाकरे यांना निवडणूक निकालाबाबत पडलेले प्रश्न हे महाभारतातील यक्षप्रश्नांप्रमाणे आहेत. महाभारतातील युधिष्ठर आणि यक्ष यांच्यातील प्रश्न-उत्तरे आणि संवाद जितका मोहक आहे, तितकेच राज ठाकरे यांना पडलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना फडणवीस यांच्याकडून मिळणारे उत्तरही कदाचित रंजक असेल. या उत्तर-संवादाची वाट महाराष्ट्रदेखील पाहत आहे, असा टोलाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
हेही वाचा – Doubts on EVMs : उत्तरासाठी भाजपातील मित्रांशी खासगी गुफ्तगू करावे, उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना सल्ला
राज ठाकरे हे यक्षाच्या भूमिकेत आहेत की युधिष्ठराच्या, हे याक्षणी कळायला मार्ग नाही. पाणी पिण्यासाठी जंगलातील एका तळ्यापाशी गेलेले नकुल, सहदेव, भीम, अर्जुन हे यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे जागेवरच मृत्युमुखी पडले. मात्र युधिष्ठराने यक्षाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि आपल्या भावांना जिवंत केले, त्याप्रमाणे भाजपाने मृत केलेली लोकशाही कोणी जिवंत करणार आहेत काय? असा सवाल ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.
राज ठाकरे यांना प्रश्न पडले आहेत. त्यांना उत्तराची अपेक्षा आहे. राज ठाकरे हे सध्या यक्षाच्या भूमिकेत विधानसभा निवडणूक निकालासंदर्भातील प्रश्नांची भेंडोळी घेऊन उभे असले तरी फडणवीस, अमित शहा किंवा भारताचा निवडणूक आयोग म्हणजे धर्मराज युधिष्ठर नाहीत. यक्षाने युधिष्ठरास एकूण 125 प्रश्न विचारले, पण सध्याच्या यक्ष महाराजांनी फडणवीसांना एकच प्रश्न विचारला, ‘तुमचा विजय खरा आहे काय? आमची मते गेली कोठे?’ यक्षाच्या 125 प्रश्नांच्या बरोबरीचा हा एकच प्रश्न आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. (Uddhav Vs Raj: Uddhav Thackeray targets BJP with Raj Thackeray)
हेही वाचा – Thackeray Vs BJP : महाराष्ट्राचे राजकारण घाणेरड्या पातळीवर नेऊन ठेवले, ठाकरेंच्या रडारवर भाजपा
Comments are closed.