Uddhav Thackeray’s Advice to Raj Thackeray


आपल्या देशातील निवडणूक आणि निवडणूक यंत्रणा राबविणारी व्यवस्था म्हणजे लुटारूंच्या टोळ्याच झाल्या आहेत. राज्यात ‘ईव्हीएम’विरोधात लढाई तर सुरूच आहे. महाराष्ट्राच्या निकालानंतर जनता अनेक ठिकाणी रस्त्यावर आली.

(Doubts on EVMs) मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या एकमेव आमदाराच्या गावातील मतदान कसे झाले ते सांगितले. माजी आमदार राजू पाटील यांच्या गावात 1400 मतदान आहे. पाटील यांना त्यांच्या स्वतःच्याच गावात एकही मत पडले नाही. हे शक्य आहे काय? असा प्रश्न राज ठाकरे यांना पडला. या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर त्यांनी भाजपातील त्यांच्या मित्रांशी खासगी गुफ्तगू करायला हवे, असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. (Uddhav Thackeray’s Advice to Raj Thackeray)

राज ठाकरे यांच्या मनात ही अशी शंका घुसळत असेल तर त्यांनी सर्वात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच मागायला हवा. अदृश्य झालेल्या मतांची हेराफेरी करून महाराष्ट्रात भाजपा तसेच त्यांचे लोक सत्तेवर आले आहेत. त्या सगळ्याचे सूत्रधार फडणवीस हेच आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हेही वाचा – Thackeray Vs BJP : महाराष्ट्राचे राजकारण घाणेरड्या पातळीवर नेऊन ठेवले, ठाकरेंच्या रडारवर भाजपा

आपल्या देशातील निवडणूक आणि निवडणूक यंत्रणा राबविणारी व्यवस्था म्हणजे लुटारूंच्या टोळ्याच झाल्या आहेत. राज्यात ‘ईव्हीएम’विरोधात लढाई तर सुरूच आहे. महाराष्ट्राच्या निकालानंतर जनता अनेक ठिकाणी रस्त्यावर आली. माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उत्तम जानकर निवडून आले, पण या जिंकलेल्या आमदारासही वाटते की, मला अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, याकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे.

मतदानाच्या मशीनमध्ये नक्कीच घोटाळा आहे. मारकडवाडी या गावात आपल्याला सर्वाधिक मतदान व्हायलाच हवे होते. ते का झाले नाही? या प्रश्नावर मारकडवाडीचेच लोक मतपत्रिकेवर निवडणुका घ्या म्हणून रस्त्यावर उतरले. धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांना त्यांच्याच गावात म्हणे शून्य मते मिळाली. त्या गावचे मतदारही कुणाल पाटील यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले, असेही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील सर्वच निवडणुका भाजपा अशाच पद्धतीने जिंकत आहे. त्यामुळे लोकांत एक प्रकारची घबराट आणि अस्वस्थता दिसत आहे. एका बाजूला पैसा तर, दुसऱ्या बाजूला हॅक केलेल्या ईव्हीएम अशा कात्रीत आपली संसदीय लोकशाही सापडली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे लोक यापुढे निवडणूक लढवू शकतील काय? तरुण कार्यकर्ते निवडणुकांपासून दूर पळतील आणि भाजपा ईव्हीएमच्या युतीने एकतर्फी निवडून येईल, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाद्वारे व्यक्त केली आहे. (Doubts on EVMs: Uddhav Thackeray’s Advice to Raj Thackeray)

हेही वाचा – Sanjay Raut : गेल्या 10 वर्षात भाजपची तिजोरी आणि मोदींचा मित्र अदाणीवर लक्ष्मी प्रसन्न – संजय राऊत



Source link

Comments are closed.