Uddhav Thackerays blunt criticism of the Maharashtra Budget 2025
मुंबई : उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी राज्याचा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी महिला, कृषी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्थसंकल्पातून भरघोस तरतुदी करण्यात आल्याची घोषणा केली. मात्र महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर आता विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा दाखवत बोचरी टीका केली आहे. (Uddhav Thackerays blunt criticism of the Maharashtra Budget 2025)
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. हा अर्थसंकल्प पाहून मला आचार्य अत्रेंची आठवण झाली. आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते, गेल्या 10 हजार वर्षात एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता. मी सभागृहात बसून अर्थसंकल्प कसा मांडला जातो, त्यातल्या काही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न मी केला. साधारणत: या अर्थसंकल्पाचा सार काढायचा झाला तर उद्या सूर्य उगवणार आहे, सर्वांना प्रकाश मिळणार आहे आणि विटामीन डी सुद्धा त्यातून मिळेल, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प असल्याची टाकी त्यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीच्या काळामध्ये महायुतीकडून वारेमाप जाहिराती केल्या गेल्या होत्या. त्यातली एक जाहिरात दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या होत्या थापा भारी आणि महाराष्ट्र केलाय कर्जबाजारी, अशी बोचरी टीका त्यांनी महायुतीवर केली. तसेच ही ओळ घेऊन महायुतीने आता पुढे जायला पाहिजे. आम्ही थापा मारू आणि यापुढेही थापा मारणे थांबवणार नाही, हे त्याचं आता घोषवाक्य झालं आहे, असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रचंड बहुमत मिळवलेलं हे सरकार आहे. त्यामुळे त्यांनी ज्याकाही थापा निवडणुकीवेळी मारल्या होत्या, त्यातील एकतरी गोष्ट या सरकारने आज केली का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकारने लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही. प्रत्येकास अन्न आणि निवारा दिला नाही. वृद्ध पेन्शन धारकांना 2100 रुपये, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर कधी होणार? 25 लाख रोजगार निर्मिती, विद्यार्थ्यांना 10 हजार रुपये, रस्ते बांधणार होते. अंगणवाडी व आशा सेविकांना 15000 हजार आणि सुरक्षा कवच दिलं आहे का? वीज बिलात 30 टक्के कपात करून आणि सौर व अक्षय उर्जेवर घर देण्याचे वचन सुद्धा पुढे सुरू राहणार आहे. या सगळ्या गोष्टी अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत.
कंत्राटदारांचा विकास करण्याचा प्रयत्न
मुंबईत 64 हजार 783 कोटींची विकास कामे होणार आहेत. यामुळे कोणाचा विकास होणार? असा प्रश्न विचारत उद्धव ठाकरे म्हणाले की, यामुळे कंत्राटदारांचा विकास होणार आहे. कारण आताच मुंबईत सगळे रस्ते खोदून ठेवले आहेत. तसेच दोन विमानतळ जोडण्यारी जी मेट्रो आहे, ती सरकार करणार आहे. पण ते काम अदाणींचं आहे. कारण विमानतळाची कामं आणि सगळी जागा अदाणीने घेतली असेल तर हे काम सुद्धा अदाणीने केलं पाहिजे. उद्या जर महायुतीने म्हटले की, अदाणीने विमानतळाची जागा दिली आहे, त्यामुळे आम्ही त्यावर रनवे बांधून देऊ, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – Maharashtra Budget 2025 : राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाची लवकरच घोषणा, अजित पवारांची माहिती
चिपी विमानतळ बंद का झाला?
पुणे-शिरुर उन्नत मार्ग, शिर्डी विमानतळ नाईड लँडिंग, नवीन विमानतळाचा विस्तार आणि विस्तार या अर्थसंकल्प मांडण्यात आलं आहे. मग चिपी विमानतळ बंद का झाला? असा प्रश्न विचारत पुढचं पाठ आणि मागचं सपाट असा हा अर्थसंकल्प असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
Comments are closed.