लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रसिद्ध गायकाने महिलेला केला किस, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गायकाने दिलं स्पष्टीकरण

प्रसिद्ध गायक उदित नारायण हे त्यांच्या उत्कृष्ट आणि सदाबहार गाण्यांसाठी ओळखले जातात. अलिकडेच झालेल्या एका सिंगिंग कॉन्सर्टमध्ये उदित नारायणच्या एका व्हायरल व्हिडिओवरून गोंधळ उडाला आहे. त्या व्हायरल व्हिडिओवर उदित नारायण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हटले आहे की, चाहत्यांचे प्रेम व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्यांनी लाखो लोकांच्या हृदयात एक आपले खास स्थान निर्माण केले आहे. मात्र, सध्या उदित नारायणला त्याच्या एका व्हिडिओमुळे वादांना तोंड द्यावे लागत आहे. उदित नारायणचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या महिला चाहतीला लिप किस करताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, सोशल मिडियावर अनेकांनी संतप्त प्रतक्रिया दिल्या. अनेरजण गायकावर संतापले.

आता यावर उदित नारायण यांची प्रतिक्रिया दिली आहे. एचटी सिटी सोबत संवाद साधताना उदित नारायण म्हणाले की, चाहत्यांना गाण्यांमुळे गायकांचे वेड असते. आपण तसं नाही आहोत, आपण सुसंस्कृत लोक आहोत. हा सर्व वेडेपणा आहे. तसेच, काही लोक गायकाला गाण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि त्याद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करतात. आता मी या गोष्टीचे काय करावे? गर्दीत बरेच लोक आहेत आणि आमचे बॉडीगार्डही तिथे असतात. पण चाहत्यांना वाटते की त्यांना त्याला भेटण्याची संधी मिळत आहे, म्हणून काही जण भेटण्यासाठी हात पुढे करतात, काही जण हातांची किस घेतात… हे सर्व चाहत्यांचं गाण्याविषयी आणि गायकांसाठीचे वेड आहे. यामुळे त्याच्याकडे इतके लक्ष देण्याची गरज नाही.

Comments are closed.