रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनचा हल्ला, तब्बल 361 ड्रोन डागले

जगातील कच्च्या तेलाचे सर्वात मोठे निर्यातदार असलेल्या रशियावर युक्रेनचे हल्ले सुरूच आहेत. रशियाच्या तेल रिफायनरीवर युक्रेनने 361 ड्रोन डागत रिफायनरी नेस्तनाबूत केल्या आहेत. या हल्ल्यात किरिशी तेल रिफायनरी जळून खाक झाली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अद्याप क्षमलेले नाही दोन्ही राष्ट्रांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. शनिवारी रात्री उशिरा युव्रेनच्या ड्रोनने रशियाच्या प्रचंड मोठय़ा किरीशी रिफायनरीवर हल्ला केला. किरिशी रिफायनरीमधून दरवर्षी 17.7 दशलक्ष मेट्रीक टन कच्च्या तेलाचे उत्पादन घेतले जाते. युक्रेनच्या अधिकाऱयांनी याबाबत माहिती दिली असून त्याची काही छायाचित्रे त्यांनी प्रसिद्ध केली. तर लेनिनग्राड क्षेत्रचे गव्हर्नर अलेक्झेंडर ड्रोज्डेंको यांनी युक्रेनची तीन ड्रोन नष्ट केल्याचा दावा केला आहे.
Comments are closed.