रशियाच्या ड्रोन बोट हल्ल्यात युक्रेनचे नौदल जहाज बुडाले

रशियाने केलेल्या पहिल्या समुद्री ड्रोन बोट हल्ल्यात गुरुवारी युक्रेनच्या नौदलाचे सर्वात मोठे जहाज सिम्फेरोपोल बुडाले. 10 वर्षांपासून हे जहाज युक्रेनच्या नौदलाच्या ताफ्यात होते. लॅगून प्रकारातील हे जहाज खास गुप्तहेरीसाठी तयार करण्यात आले होते. समुद्री ड्रोनच्या माध्यमातून रशियाने हा हल्ला केला. युक्रेनेनही याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात एका क्रू मेंबरचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. दरम्यान, जहाजातील इतर सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. तर काहीजण बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
Comments are closed.