बीड प्रभारी जिल्हाप्रमुखपदी उल्हास गिराम पाटील

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उल्हास गिराम पाटील यांची शिवसेना बीड प्रभारी जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास गिराम पाटील यांचे गेवराई, आष्टी तर जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांचे बीड, माजलगाव आणि जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांचे केज, परळी असे कार्यक्षेत्र असेल. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
Comments are closed.