कवितेवेळी केवळ टाळ्या वाजवल्या नाही म्हणून चिमुकल्याला बेदम मारहाण; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

उल्हासनगर बातम्या: उल्हासनगरमध्ये एका प्री-स्कूलमध्ये इंग्रजीत कविता शिकवताना चिमुकल्याने टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अखेर या प्रकरणात उल्हासनगर पोलिसांनी शिक्षकेविरोधात गुन्हा (Ulhasnagar Crime News) दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. उल्हासनगरमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका चिमुकल्याला कविता शिकवताना शिक्षिका टाळ्या वाजवायला सांगते. मात्र चिमुकला टाळ्या वाजवत नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, शिक्षिकेने या चिमुकल्याला एकदा दोनदा नाहीतर तीनदा मारहाण (Crime News) केली. शेवटी हा चिमुकला शिक्षकेचा हात पकडतो. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी तपास सुरू केला. हा व्हिडिओ उल्हासनगर परिसरातील एक्सीलेंट किल्ड वर्ल्ड या प्री-स्कूलच्या असल्याचे समोर आले.

दरम्यानव्हिडिओची सत्यता समोर आल्यानंतर या प्रकरणात विठ्ठलवाडी पोलिसांनी शिक्षिका गायत्री पात्रा विरोधात बाळ संरक्षण कायदा (75) गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या प्रकरणामुळे पालक आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

वाईन मार्ट चालकाला बेदम मारहाण, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

नांदेड (Nanded) शहरात एक धक्कादायक घटना घडली असून रात्री 9.30 ते 9.45 दरम्यान छत्रपती शिवाजी पुतळा जवळील नांदेड वाईन मार्ट येथे 2 युवकांनी वाईन मार्ट चालकासह कर्मचाऱ्यांना बेदम महारान केली. यात वाईन मार्ट चालक रितेश जयस्वाल यांच्यासह कर्मचाऱ्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या मारहाणीची संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या वाईन मार्टमध्ये आधी 2 युवकांनी मद्य खरेदी केले. त्यानंतर ऑनलाइन रक्क्कमी टाकली, असे सांगितले. त्यानंतर रक्कम मिळाली नाही असे सांगण्यात आल्यानंतर ‘काय करतो ते कर पैसे देत नाही जा’ म्हणत दुकानमध्ये घुसून ही मारहाण सुरू केली.

या मारहाणीत रितेश जयस्वाल यांचा डोक्याला 8 टक्के लागले आहे. इथून पूढे मला हफ्ता पाहिजे तसेच नाही दिले तर जीवे मारू, अशी धमकी सुद्धा या वेळी त्यांनी दिल्याचे रितेश जयस्वाल यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळाची पाहणी केली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे?

इतर प्रख्यातच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.