India Pakistan Tension – उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक! पाकिस्तानी हॅकर्सकडून दावा

हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये सीमेवर युद्धाचा भडका उडाला. दुसरीकडे पाकड्यांनी हिंदुस्थानमध्ये सायबर हल्लेही सुरू केलेत. या सायबर हल्ल्यात उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट हॅक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उल्हासनगर महापालिकेची वेबसाईट पाकिस्तानी हॅकर्सनी हॅक केल्याचा दावा केला आहे. यानंतर महापालिकेच्या टेक्निकल टीमकडून तपासणी सुरू आहे. लवकरच अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. उल्हासनगरच्या वेबसाईटवर गेल्यावर तिथे We are Under Maintenance अशी सूचना देण्यात येत आहे.
टिटवाळ्यात ‘ब्लॅक स्पॉट’ची दहशत, वाजपेयी चौक-बल्याणी मार्गावर खोल खड्ड्याचा धोका
Comments are closed.