क्रिकेट विश्वावर हादरलं! सामन्यादरम्यान मैदानातच अंपायरने सोडला जीव; खेळाडूही गंभीर जखमी, नेमकं

क्रीडा जगताला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान मधमाशांनी केलेल्या भीषण हल्ल्यात 65 वर्षीय अनुभवी पंचांचा मृत्यू झाला आहे, तर अन्य काही खेळाडू जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सप्रू मैदानावर KDMA अंडर-13 क्रिकेट लीगचा सामना सुरू असताना ही दुर्घटना घडली. YMCC आणि पॅरामाउंट या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. यावेळी अचानक सामन्याच्या मध्यभागी मधमाश्यांनी मैदानावर हल्ला केला.

सामन्यादरम्यान मधमाशांच्या हल्ल्यात पंचाचा मृत्यू (Cricket umpire dies of bee attack during match)

या हल्ल्यात सामन्याचे मुख्य पंच मानिक गुप्ता (65) यांना मधमाशांनी अक्षरशः घेरले. पांढऱ्या कपड्यांमुळे मधमाशांचा थवा त्यांच्याकडे आकर्षित झाला आणि सुमारे 10 मिनिटे त्यांच्यावर डंख मारत राहिला. यातच त्यांचा मृत्यू झाला. पंच मानिक गुप्ता यांच्यासोबत असलेले दुसरे पंच जगदीश शर्मा आणि काही तरुण खेळाडू देखील यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कानपूर येथील हॅलेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मृत मानिक गुप्ता हे गेल्या 30 वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या (KCA) पंच पॅनेलचे सक्रिय सदस्य होते. घटनेनंतर सर्वांना तातडीने शुक्लागंज येथील रुग्णालयात आणि त्यानंतर कानपूरमधील लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टिट्यूटमध्ये हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच गुप्ता यांची प्राणज्योत मालवली होती.

क्रीडा वर्तुळातून व्यक्त झाला शोक

या घटनेमुळे उत्तर प्रदेशातील क्रिकेट वर्तुळावर शोककळा पसरली आहे. KCA चे अध्यक्ष संजय कपूर यांनी मानिक गुप्ता यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “मानिक गुप्ता हे खेळासाठी समर्पित व्यक्तिमत्त्व होते. KCA परिवार या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल.”

हे ही वाचा –

T20 World Cup 2028 : विश्वचषकात बांगलादेशचा धमाकेदार कमबॅक! ऑस्ट्रेलियाचीही एन्ट्री… ICC ची अधिकृत घोषणा, अंतिम यादी किती संघांना मिळाली जागा?

आणखी वाचा

Comments are closed.