क्रिकेट जगताला हादरवून टाकणारी बातमी; मैदानातच अंपायरने सोडला जीव

उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये स्थानिक क्रिकेट सामन्यात घडलेल्या अनपेक्षित घटनेने संपूर्ण क्रिकेट वर्तुळ हादरले आहे. केडीएमए अंडर-१३ लीगच्या सामन्यात व्हायएमसीसी आणि पॅरामाउंट संघांमध्ये जोरदार लढत सुरू असताना अचानक मैदानावर मधमाशांचा थवा हल्ला करीत आला. या हल्ल्यामुळे खेळाडू घाबरून जमिनीवर पडले आणि काही जण पळत बचाव करण्याचा प्रयत्न करत होते.
या भीषण हल्ल्याचा सर्वाधिक फटका सामन्याचे मुख्य पंच मानिक गुप्ता यांना बसला. वयाच्या ६५ व्या वर्षीही क्रिकेटसाठी समर्पित असलेल्या गुप्ता यांचे अंग पांढऱ्या कपड्यांनी आच्छादित होते, ज्यामुळे मधमाशांचा थवा त्यांच्याकडे अधिक आकर्षित झाला. सलग १० मिनिटे मधमाशांनी त्यांच्यावर डंख घातले, परिणामी त्यांची प्रकृती गंभीर झाली. तातडीने त्यांना शुक्लागंज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, आणि नंतर अधिक उपचारासाठी कानपूरमधील लक्ष्मीपत सिंघानिया इन्स्टिट्यूट येथे हलवण्यात आले, परंतु दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
याच हल्ल्यात दुसरे पंच जगदीश शर्मा आणि काही तरुण खेळाडू देखील जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर कानपूरमधील हॅलेट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
मानिक गुप्ता हे गेल्या ३० वर्षांपासून कानपूर क्रिकेट असोसिएशनच्या पंच पॅनेलचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांच्या अकस्मीत निधनामुळे संपूर्ण क्रिकेट समुदाय शोकाकुल झाला आहे. या घटनेने मैदानावर सुरक्षा उपायांबाबत गंभीर चर्चा उभा केला आहे, कारण खेळाडू आणि पंचांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ही घटना स्थानिक क्रिकेट प्रेमींना धक्का देणारी आहे, तरीही यामुळे खेळाच्या उत्साहावर आघात झाला तरी, सुरक्षिततेच्या उपाययोजना अधिक कटाक्षाने राबवण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
Comments are closed.